WTC Final:वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपसाठी टीम इंडिया इंग्लंडला रवाना, पण 'हे' खेळाडू भारताताच

Team India: भारतीय क्रिकेट संघाची पहिली बॅच आणि सपोर्ट स्टाफ आज इंग्लंडला रवाना झाले. भारत आणि ऑस्ट्रेलियात वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप खेळवली जाणार असून भारतीय खेळाडू वेगवगेळे रवाना होणार आहेत. 

राजीव कासले | Updated: May 23, 2023, 05:05 PM IST
WTC Final:वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपसाठी टीम इंडिया इंग्लंडला रवाना, पण 'हे' खेळाडू भारताताच title=

WTC Final 2023: आयपीएलचा सोळावा हंगाम (IPL 2023) आता अंतिम टप्प्यात पोहोचला आहे. आजपासून क्लालिफाईंग (Qualifier) सामने खेळवले जाणार असून येत्या 28 मे रोजी आयपीएलचा चॅम्पियन संघ ठरणार आहे. आयपीएल संपल्यानंतर लगेचच म्हणजे जून महिन्याच्या पहिल्याच आठवड्यात वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप (World Test Championship) खेळवली जाणार आहे. भारत आणि ऑस्ट्रेलियादरम्यान (India vs Australia) इंग्लंडच्या ओव्हल मैदानावर अंतिम सामना रंगणार असून 7 ते 11 जूनदरम्यान हा सामना रंगेल.

टीम इंडियाची पहिली बॅच रवाना
वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्यासाठी भारतीय क्रिकेट संघ वेगवेगळ्या ग्रुपमध्ये इंग्लंडला (England) पोहोचणार आहेत. यातली पहिली बॅच आज इंग्लंडसाठी रवाना झाली. संपूर्ण संघ 30 मेपर्यंत लंडनमध्ये दाखल होईल. पहिल्या बॅचमध्ये अक्षर पटेल, शार्दुल ठाकूर आणि भारतीय क्रिकेट संघाचा सपोर्ट स्टाफ रवाना झाला आहे. पण विराट कोहली (Virat Kohli) आणि आर अश्विन (R Ashwin) हे सीनिअर्स खेळाडू मात्र भारतातच थांबले आहेत. विराटची रॉयल चॅलेंजर्स बंगलोर आणि आर अश्विनची राजस्थान रॉयल्स आयपीएल स्पर्धेतून बाद झाली आहे. पण यानंतरही ते टीमबरोबर रवाना झाले आहेत. 

पहिल्या बॅचमध्ये एकूण 20 सदस्य आहेत. यात भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविडदेखील आहेत. याशिवाय बंगालचा मध्यमगती गोलंदाज आकाश दीप, दिल्लीचा ऑफ स्पिनर पुलकित नारंगही टीम इंडियाबरोबर इंग्लंडला रवाना झाले आहेत.  आकाश आणि पुलकित नेट बॉलर म्हणून संघाबरोबर असणार आहेत. वेगवान गोलंदाज उमेश यादवला आयपीएलदरम्यान दुखापत झाली होती. पण आता तो पूर्णपणे फिट आहे. पहिल्या बॅचबरोबर उमेश यादवही रवाना होणार असल्याचं बोललं जात होतं, पण आता तो दुसऱ्या बॅचबरोबर जाणार आहे. त्याच्याबरोबर राजस्थानचा वेगवान गोलंदाज अनिकेत चौधरी आणि आंध्रप्रदेशचा गोलंदाज पृथ्वी राज यारा देखेली लंडनला रवाना होणार आहेत. 

वेगवान गोलंदाज जयदेव उनाडकटच्या खांद्यावर उपचार सुरु असून 27 मे रोजी तो लंडनसाठी रवाना होण्याची शक्यता आहे. तर ऋतुराज गायकवाड आणि सूर्यकुमार यादव आयपीएल संपल्यानंतर लंडनमध्ये दाखल होतील. 

WTC Final 2023 साठी भारतीय संघ

रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली, अजिंक्य रहाणे, केएस भरत (विकेट कीपर), ईशान किशन (विकेटकीपर), रविचंद्रन अश्विन, रविंद्र जडेजा, अक्षर पटेल, शार्दुल ठाकुर, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, उमेश यादव, जयदेव उनादकट

राखीव खेळाडू : ऋतुराज गायकवाड, मुकेश कुमार, सूर्यकुमार यादव