बुमराहला लग्नाच्या शुभेच्छा देताना मयंक अग्रवाल ट्रोल, संजना ऐवजी संजय...

जसप्रीत बुमराहने आज स्पोर्ट्स अँकर संजना गणेशसोबत लग्नगाठ बांधली.

Updated: Mar 15, 2021, 07:31 PM IST
बुमराहला लग्नाच्या शुभेच्छा देताना मयंक अग्रवाल ट्रोल, संजना ऐवजी संजय... title=

मुंबई : जसप्रीत बुमराहने आज स्पोर्ट्स अँकर संजना गणेशसोबत लग्नगाठ बांधली. लग्नानंतर या जोडप्याला सोशल मीडियावर अभिनंदन करणारे मेसेजेस येऊ लागले आहेत. जसप्रीत बुमराहचा सहकारी खेळाडू मयांक अग्रवाल यानं ही या नव्या जोडप्याला लग्न बंधनात अडकल्याबद्दल त्यांचं अभिनंदन केले आहे. मात्र, त्यांचे अभिनंदन करताना त्याच्याकडून मोठी चूक झाली आहे.

मयंक अग्रवालने अभिनंदन करताना संजना गणेशनला टॅग न करता माजी भारतीय फलंदाजी प्रशिक्षक संजय बांगर यांना टॅग केले. मात्र, काही काळानंतर मयंक अग्रवाल यांना त्यांची चूक लक्षात आली आणि यानंतर त्यांनी लगेचच त्यांचं ट्विट हटवलं, मात्र त्याआधीच अनेक चाहत्यांनी त्यांच्या ट्विटचे स्क्रीनशॉट घेतले होते. आता मयंक अग्रवाल यांच्या ट्विटचा स्क्रीनशॉट सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यानंतर नेटकरी त्यांना जोरदार ट्रोल करताना दिसत आहेत.