राष्ट्रकुल स्पर्धा : भारताला आणखी दोन पदकं, महाराष्ट्र कन्येला सुवर्ण

गोल्ड कोस्ट राष्ट्रकुल स्पर्धेत पदतालिकेत तिसऱ्या क्रमांकावर असणाऱ्या भारताने आज जोरदार कामगिरी केलेय. भारताच्या खात्यात आणखी दोन पदकांची भर टाकलेय.  

Surendra Gangan सुरेंद्र गांगण | Updated: Apr 13, 2018, 09:27 AM IST
राष्ट्रकुल स्पर्धा : भारताला आणखी दोन पदकं, महाराष्ट्र कन्येला सुवर्ण title=

गोल कोस्ट : येथील राष्ट्रकुल स्पर्धेत पदतालिकेत तिसऱ्या क्रमांकावर असणाऱ्या भारताने आज जोरदार कामगिरी केलेय. भारताच्या खात्यात नवव्या दिवशी आणखी दोन पदकांची भर पडलेय.  महाराष्ट्राच्या तेजस्विनी सावंत हिने सुवर्ण पदकाची कमाई केली तर अंजुम मुद्गीलने रौप्य पदक पटकावले.राष्ट्रकुल स्पर्धांमध्ये आठव्या दिवशीही भारतीय खेळाडूंनी पदकांची लयलूट केली. या कामगिरीमुळे पदकतालिकेतले तिसरे स्थान पटकावले. नेमबाजीमध्ये आज दोन पदकांची भर पडल्याने भारताचे स्थान भक्कम होण्यास मदत झालेय.

तेजस्विनीचे दुसरे पदक

नेमबाजीच्या ५० मीटर रायफल थ्री पोजीशन प्रकारात भारताच्या तेजस्विनी सावंतला सुवर्ण तर अंजुन मुद्गीलला रौप्य पदक मिळालेय. ५० मीटरच्या रायफल थ्री पोजीशन प्रकारात भारताची तेजस्विनी सावंत, अंजुम मुद्गील अंतिम फेरीत धडक मारली होती. त्यांनी आज चांगली कामगिरी करत पदकांची कमाई केली. तेजस्विनी सावंतचे हे दुसरे पदक आहे. त्याआधी तिने रौप्य पदक मिळवले होते. राष्ट्रकुल स्पर्धेत तिचे दुसरे पदक असल्याने महाराष्ट्रातील कोल्हापूर या तिच्या गावी जल्लोष साजरा करण्यात येत आहे.

दोघांना स्पर्धेतून बाहेर काढले

भारताला कुस्तीपटूंकडून पदकाची काल कमाई केली होती. सध्या भारत १५ सुवर्ण आणि ८ रौप्य पदकांसह पदकतालिकेत तिसऱ्या स्थानावर कायम आहे.  दरम्यान,
ऑस्ट्रेलियातल्या गोल्ड कोस्टमध्ये सुरू असलेल्या राष्ट्रकुल स्पर्धेतून दोन भारतीय खेळाडूंना स्पर्धेतून नियम भंग केल्याच्या कारणावरुन बाहेर काढण्यात आलंय. के टी इरफान आणि व्ही राकेश बाबू अशी या दोन खेळाडूंची नावं आहे. 

पाहा पदतालिका तक्ता