सनरायजर्स हैदराबादपासून वेगळा झाला हा खेळाडू, फोटो शेअर करत केली घोषणा

आयपीएल फ्रँचायझी सनरायझर्स हैदराबादचा (Sunrisers Hyderabad)  माजी कर्णधार आणि सलामीवीर डेव्हिड वॉर्नरने ( David warner ) संघातून बाहेर पडण्याची घोषणा केली आहे. 

Updated: Oct 10, 2021, 04:44 PM IST
सनरायजर्स हैदराबादपासून वेगळा झाला हा खेळाडू, फोटो शेअर करत केली घोषणा title=

मुंबई : आयपीएल फ्रँचायझी सनरायझर्स हैदराबादचा (Sunrisers Hyderabad)  माजी कर्णधार आणि सलामीवीर डेव्हिड वॉर्नरने ( David warner ) संघातून बाहेर पडण्याची घोषणा केली आहे. त्याने इन्स्टाग्रामवर फोटो शेअर करून याबाबत माहिती दिली आहे. या हंगामाच्या सुरुवातीला वॉर्नर संघाचा कर्णधार होता, पण त्यानंतर खराब फॉर्ममुळे त्याला कर्णधारपदावरुन काढून टाकण्यात आले. त्याच्या जागी न्यूझीलंडच्या केन विल्यमसनला नवीन कर्णधार बनवण्यात आले. यानंतर, आयपीएल 2021 च्या यूएईमधील काही सामन्यांनंतर त्याला संघातून वगळण्यात आले.

मात्र, वॉर्नरने आधीच संघापासून वेगळे होण्याचे संकेत दिले होते. मुंबई इंडियन्सविरुद्धच्या सामन्याच्या सुरुवातीला त्याने त्याच्या इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर करून हैदराबाद संघाला निरोप देण्याचे संकेत दिले होते.

'सर्व आठवणींसाठी धन्यवाद. सर्व चाहत्यांचे मनापासून आभार जे संघाला नेहमीच चांगली कामगिरी करण्यासाठी सपोर्ट करतात. तुम्ही सर्वांनी संघाला जेवढी साथ दिली आहे, त्यासाठी मी स्तुती करतो. हा एक अद्भुत प्रवास होता. मला आणि माझे कुटुंब सर्वांना मिस करेल.' असं वॉर्नरने म्हटलं आहे.