साहाच्या अडचणी संपेना; पत्रकारासोबतच्या वादाच्या प्रकरणाला वेगळं वळण

साहाने काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर एक स्क्रिनशॉट शेअर केला होता. यामध्ये एक पत्रकार त्याला धमकी देत असल्याचं त्याने म्हटलं होतं.

Updated: Mar 6, 2022, 09:24 AM IST
साहाच्या अडचणी संपेना; पत्रकारासोबतच्या वादाच्या प्रकरणाला वेगळं वळण title=

मुंबई : टीम इंडियाचा खेळाडू वृद्धीमान साहा गेल्या काही दिवसांपासून खूर चर्चेत आहे. तर वृद्धीमान साहाच्या अडचणी काही संपण्याचं नाव घेत नाहीयेत. विकेटकीपर आणि फलंदाज साहाने काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर एक स्क्रिनशॉट शेअर केला होता. यामध्ये एक पत्रकार त्याला धमकी देत असल्याचं त्याने म्हटलं होतं. तर आता खुद्द तो पत्रकारच समोर आला आहे.

वृद्धीमान साहा यांने शनिवारी सांगितलं होतं की, बीसीसीआयची चौकशी करणाऱ्या समितीला सर्व माहिती सांगण्यात आली आहे. मात्र त्यानंतर काही तासांनी पत्रकार बोरिया मजुमदार यांनी ट्विटरवर त्यांचा व्हिडिओ शेअर केलाय. 

यामध्ये पत्रकार बोरिया यांनी 9 मिनिटांचा व्हिडिओ ट्विट करताना साहाने ट्विटरवर टाकलेल्या स्क्रीन शॉट्सवर स्पष्टीकरण दिलं आहे. साहाने ते योग्य पद्धतीने पोस्ट केलं नसून, त्याला वळणदार पद्धतीने मांडण्यात आलं आहे. मला साहाची मुलाखत घ्यायची होती, पण त्याने नकार दिला. यानंतर आता ते साहावर मानहानीचा दावा दाखल करणार आहेत.

बोरिया मजुमदार म्हणाले, 'कोणत्याही गोष्टीला नेहमी दोन बाजू असतात. वृद्धीमानने माझ्या व्हॉट्सअॅप चॅटच्या स्क्रीनशॉटमध्ये छेडछाड केली आहे. मी बीसीसीआयला निष्पक्ष चाचणीची विनंती केलीये. माझे वकील रिद्धिमान साहा यांना मानहानीची नोटीस पाठवणार आहेत.

या प्रकरणाच्या चौकशीसाठी बीसीसीआयने स्थापन केलेल्या तीन सदस्यीय समितीची साहाने भेट घेतल्याच्या काही तासानंतर बोरिया यांची पोस्ट समोर आली.