धरमशालामध्ये टॉस ठरणार बॉस

भारत आणि श्रीलंका यांच्यात रविववारी धरमशालाच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियममध्ये पहिला वनडे सामना खेळवला जाणार आहे. कसोटीमध्ये १-० असा विजय मिळवल्यानंतर आता वनडेतही भारतीय संघ श्रीलंकेविरुद्ध विजय मिळवण्यासाठी प्रयत्नशील असेल.

archana harmalkar अर्चना हरमलकर | Updated: Dec 9, 2017, 09:02 AM IST
धरमशालामध्ये टॉस ठरणार बॉस title=

धरमशाला : भारत आणि श्रीलंका यांच्यात रविववारी धरमशालाच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियममध्ये पहिला वनडे सामना खेळवला जाणार आहे. कसोटीमध्ये १-० असा विजय मिळवल्यानंतर आता वनडेतही भारतीय संघ श्रीलंकेविरुद्ध विजय मिळवण्यासाठी प्रयत्नशील असेल.

धरमशालामध्ये होणाऱ्या पहिल्या वनडेत टॉस महत्त्वपूर्ण ठरणार आहे. सामन्यातील पिचची स्थिती ठरवेल की सुरुवातीला गोलंदाजी करायची की फलंदाजी.

पिचवर गवत असल्यास संध्याकाळी पडणाऱ्या दवामुळे पिचमध्ये ओलावा राहील ज्याचा फायदा गोलंदाजांना होईल. त्यामुळे टॉस जिंकून कोणता संघ काय निर्णय घेतो हे महत्त्वाचे ठरणार. 

वातावरणामुळे सामन्याची वेळ दोन तास आधी सामना सुरु केला जाणार आहे. धरमलशालामध्ये होणारा वनडे सामना सकाळी साडे अकरा वाजता सुरु होणार आहे. दुसरी इनिंग दुपारी चार वाजता सुरु होईल. 

सामन्याआधी दोन्ही संघांनी केला सराव

वनडे सामन्याआधी दोन्ही संघांनी दमदार सराव केला. शुक्रवारी सकाळच्या सत्रात श्रीलंकेच्या संघाने तर संध्याकाळच्या सत्रात भारतीय संघाने सराव केला.