धोनीचे ईशान किशनला महत्त्वाचे सल्ले

गेल्या काही मॅचमध्ये पराभव झालेल्या मुंबईच्या टीमला अखेर विजय मिळाला आहे.

Updated: Apr 29, 2018, 10:56 PM IST
धोनीचे ईशान किशनला महत्त्वाचे सल्ले title=

पुणे : गेल्या काही मॅचमध्ये पराभव झालेल्या मुंबईच्या टीमला अखेर विजय मिळाला आहे. मुंबईनं यंदाच्या आयपीएलमधली सगळ्यात तगडी टीम चेन्नईला पराभवाची धूळ चारली आहे. या मॅचमध्ये मुंबईनं टॉस जिंकून चेन्नईला पहिले बॅटिंगसाठी बोलावलं. २० ओव्हरमध्ये चेन्नईला १६९ रनपर्यंत मजल मारता आली. आयपीएलमधलं आव्हान कायम ठेवण्यासाठी मुंबईला ही मॅच जिंकणं आवश्यक होतं. रोहित शर्मानं अर्धशतक करुन मुंबईला जिंकवून दिलं.

या मॅचमध्ये धोनीनं २६ रनची खेळी केली. पण तो वेगळ्याच कारणासाठी चर्चेत राहिला. या मॅचदरम्यान धोनीनं विकेट कीपर ईशान किशनला विकेट कीपिंगचे सल्ले दिले. आयपीएलमध्ये मुंबईकडून खेळणारा ईशान किशन झारखंडकडून क्रिकेट खेळतो. महेंद्रसिंग धोनीही झारखंडचाच खेळाडू आहे. मुंबई आणि चेन्नईमध्ये झालेल्या या मॅचमध्ये धोनी आणि ईशान समोरासमोर आले. यावेळी ईशान किशननं धोनीकडून विकेट कीपिंगचे धडे घेतले. धोनी आणि ईशान किशनचे हे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.