धोनीचा पेट्रोल पंपावरचा तो फोटो भारत बंद वेळचा?

पेट्रोल आणि डिझेलच्या वाढत्या किंमतींविरोधात काँग्रेससह विरोधी पक्षांनी सोमवारी भारत बंद आंदोलन केलं होतं.

Updated: Sep 11, 2018, 07:51 PM IST
धोनीचा पेट्रोल पंपावरचा तो फोटो भारत बंद वेळचा? title=

मुंबई : पेट्रोल आणि डिझेलच्या वाढत्या किंमतींविरोधात काँग्रेससह विरोधी पक्षांनी सोमवारी भारत बंद आंदोलन केलं होतं. या भारत बंदमध्ये भारतीय क्रिकेटपटू महेंद्रसिंग धोनी त्याच्या पत्नीसह रस्त्यावर उतरल्याचे काही फोटो सोशल नेटवर्किंगवर व्हायरल होत आहेत. या फोटोमध्ये धोनी आणि त्याची पत्नी साक्षी एका पेट्रोल पंपावर बसल्याचं पाहायला मिळत आहे. धोनी आणि साक्षी पेट्रोल पंपावरच्या व्यक्तींशी बोलताना दिसत आहेत. जेव्हापासून पेट्रोल-डिझेलचे भाव वाढले तेव्हापासून मी हेलिकॉप्टर शॉट मारायचं सोडून दिलं आहे, असं कॅप्शन या फोटोला देण्यात आलंय.

काय आहे फोटोचं सत्य?

व्हायरल होत असलेला धोनी आणि त्याच्या पत्नीचा फोटो भारत बंद आंदोलनातला नाही. धोनीचा हा फोटो २९ ऑगस्टचा आहे. धोनी त्याच्या पत्नीसोबत शिमल्याला गेला असतानाचा हा फोटो आहे. यावेळी रस्त्यावरच्या एका पेट्रोल पंपावर धोनी थांबला आणि काही वेळ घालवला. यानंतर तिथल्या स्थानिकांनी धोनीसोबत फोटो काढले होते. त्यामुळे धोनीनं भारत बंदला समर्थन केल्याचे हे फोटो खोटे आहेत. एका जाहिरातीच्या शूटिंगसाठी धोनी शिमल्याला गेला होता.