...म्हणून भारत-श्रीलंका दुसऱ्या वनडेआधी राष्ट्रगीत होणार नाही

भारत-श्रीलंका यांच्यातील पाच वनडे सामन्यांच्या मालिकेतील दुसरा सामना २४ ऑगस्टला पल्लेकेले मैदानात खेळवला जातोय. 

Updated: Aug 23, 2017, 06:10 PM IST
...म्हणून भारत-श्रीलंका दुसऱ्या वनडेआधी राष्ट्रगीत होणार नाही title=

पल्लेकेले : भारत-श्रीलंका यांच्यातील पाच वनडे सामन्यांच्या मालिकेतील दुसरा सामना २४ ऑगस्टला पल्लेकेले मैदानात खेळवला जातोय. या वनडे आधी राष्ट्रगीत होणार नसल्याचे वृत्त समोर आलेय. श्रीलंका क्रिकेट संघाचे मीडिया मॅनेजर दिनेश रत्नासिंघम यांनी या वृत्ताला दुजोरा दिलाय.

भारत-श्रीलंका पहिल्या वनडे सामन्यात राष्ट्रगीत गायले गेले होते. त्यानंतर आता कोलंबोमधील प्रेमदासा मैदानावर होणाऱ्या पहिल्या टी-२० सामन्याआधी राष्ट्रगीत होणार आहे. बाकी मैदानांवरील सामन्यांआधी राष्ट्रगीत होणार नाही, असे मीडिया मॅनेजर दिनेश यांनी सांगितले. 

आतापर्यंतच्या क्रिकेट इतिहासात सामन्याच्या सुरुवातीला दोन्ही देशांचे राष्ट्रगीत गायले जाते. मात्र या परंपरेला श्रीलंका बोर्डाने छेद दिलाय. याआधी तीन कसोटी सामन्यांच्या मालिकेतील पहिल्या कसोटी सामन्यात राष्ट्रगीत झाले होते. त्यानंतर पुढील दोन्ही कसोटी सामन्यांमध्ये राष्ट्रगीत झाले नाही.