ENG vs IND, 5Th Test : जो रुट आणि जॉनी बेयरस्टोचा शतकी धमाका, टीम इंडियावर 7 विकेट्सने विजय

इंग्लंडने टीम इंडियावर (Team India) पाचव्या कसोटी (ENG vs IND, 5Th Test)  सामन्यात 7 विकेट्सने दणदणीत विजय मिळवला आहे.  

Updated: Jul 5, 2022, 05:37 PM IST
ENG vs IND, 5Th Test :  जो रुट आणि जॉनी बेयरस्टोचा शतकी धमाका, टीम इंडियावर 7 विकेट्सने विजय title=

एजबस्टन : इंग्लंडने टीम इंडियावर (Team India) पाचव्या कसोटी (ENG vs IND, 5Th Test)  सामन्यात 7 विकेट्सने दणदणीत विजय मिळवला आहे. टीम इंडियाने इंग्लंडला विजयासाठी 378 धावांचे आव्हान दिले होते. इंग्लंडने हे आव्हान 3 विकेट्सच्या मोबदल्यात पूर्ण केलं. जो रुट (Joe Root) आणि जॉनी बेयरस्टो (Jonny Bairstow) हे दोघे इंग्लंडच्या विजयाचे हिरो ठरले. या दोघांनी नाबाद आणि निर्णायक शतकी खेळी केली. या विजयासह 5 सामन्यांची मालिका इंग्लंडला 2-2 ने बरोबरीत सोडवण्यात यश आलं. (eng vs ind 5th rescheduled test match england win by 7 wickets joe root and jonny bairstow smashed century series ends at 2 2)

टीम इंडियाचा दुसरा डाव चौथ्या दिवशी 245 धावांवर आटोपला. मात्र पहिल्या डावातील 132 धावांच्या आघाडीच्या जोरावर टीम इंडियानं इंग्लंडसमोर  378 धावांचे आव्हान ठेवलं.

या कसोटीआधी इंग्लंडने न्यूझीलंड विरुद्धच्या 3 सामन्यात चौथ्या डावात 270 पेक्षा अधिक धावांचा यशस्वी पाठलाग केला. 

इंग्लंडने चौथ्या दिवसाखेरीस 3 विकेट्स 259 धावा केल्या होत्या. इंग्लंडने यासह आपल्या विजयाची दावेदारी आणखी मजबूत केली.

दीड तासात खेळ खल्लास

जो रुट आणि जॉनी बेयरस्टो ही जोडी गेल्या काही काळापासून धमाकेदार कामगिरी करतायेत. या जोडीने पाचव्या दिवशी पहिल्याच सत्रातच गेम ओव्हर करुन टाकला. 

या दोघांनी पहिल्याच सत्रातील दीड तासातच उर्वरित 159 धावा कुटल्या. यासह इंग्लंडने ऐतिहासिक विजय मिळवला आणि मालिका बरोबरीत सोडवली. 

टीम इंडियाने जॉनीला चौथ्या दिवशी  2 वेळा आऊट करण्याची संधी गमावली. मात्र जॉनीने पाचव्या दिवशी बेजबाबदारपणे खेळी केली नाही. 

रुटने 82 च्या स्ट्राईक रेटने 28 वं शतक पूर्ण केलं. तर जॉनीने 78 च्या स्ट्राईक रेटने 115 धावा कुटल्या. विशेष म्हणजे जॉनीचं हे सलग चौथं आणि कारकिर्दीतील 12 वं कसोटी शतक ठरलं. 

या दोघांनी चौथ्या डावात नाबाद 269 धावांची भागीदारी केली. ही भागीदारी कसोटी क्रिकेटच्या इतिहासातील चौथ्या ते त्याखालच्या विकेटसाठीची विक्रमी भागीदारी ठरली.