फाफ ड्यु प्लेसीस संतापला, या बॉलरला पराभवासाठी धरलं कारणीभूत

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूसाठी नायक असलेला खेळाडू पुढच्या काही मिनिटांत खलनायक बनला. 

Updated: Mar 28, 2022, 02:57 PM IST
फाफ ड्यु प्लेसीस संतापला, या बॉलरला पराभवासाठी धरलं कारणीभूत title=

मुंबई : पंजाब विरुद्धच्या सामन्या फाफ ड्यु प्लेसीसने धावांचा पाऊस पाडला. 200 हून अधिक धावांचं आव्हान पंजाबसमोर ठेवूनही त्यांना पराभवाचा सामना करावा लागला. रविवारी पंजाब किंग्सचे स्मिथने संपूर्ण सामन्याची बाजी पलटवली. त्याने मिळालेल्या संधीचं सोनं करत 8 बॉलवर 25 धावा काढल्या आणि पंजाबला विजय मिळवून दिला. 

फाफ पराभवानंतर संतापला

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूसाठी नायक असलेला खेळाडू पुढच्या काही मिनिटांत खलनायक बनला. मॅच टर्निंग पॉईंटवर असताना 17 व्या ओव्हर दरम्यान अनुज रावतने स्मिथची कॅच सोडली. हातात आलेली कॅच सुटल्याने स्मिथला खेळण्याची संधी मिळाली. ती एक चूक बंगळुरू संघाला चांगलीच महागात पडली.
 
पुढच्या 8 बॉलमध्ये स्मिथने चौकार आणि षटकार ठोकून त्याने 25 धावा केल्या आणि पंजाबला विजय मिळवून दिला. तो कॅच सोडला नसता तर बंगळुरू संघाचा विजय झाला असता असंही यावेळी फाफ म्हणाला. त्या घटनेमुळे फाफ चांगलाच संतापल्याचं पाहायला मिळालं. 
 
एक कॅच तुम्हाला मॅच जिंकवून देऊ शकतो तर तोच कॅच सुटला तर मॅच पराभूत होऊ शकते असं म्हटलं जातं ते खोटं नाही. आज हेच सूत्र प्रत्यक्षात बंगळुरू संघाने अनुभवलं. अनुजसाठी हा क्षण आणि ही मॅच आयुष्यातला महत्त्वाचा धडा असू शकते जी तो कदाचित कधीच विसरणार नाही.

पराभवाचं खापर कोणावर फोडलं?

'मला वाटतं की बॅटिंगच्या बाजूने आम्ही खूप चांगली कामगिरी केली. मात्र शेवटची कॅच सोडली तिथे आमची चूक झाली. ती एक कॅच संघाला खूप महागात पडली.  ओडियन स्मिथच्या 10 धावा झाल्या होत्या तेव्हा ती कॅच सुटली. त्यानंतर त्याने 8 बॉलमध्ये 25 धावा केल्या. ती एक चूक बंगळुरूसाठी खूप महागात पडली.' 
 
'स्टेडियमवर थोडा दव होता. त्यामुळे गोलंदाजीमध्ये देखील अडचणी येत होत्या. दवामुळे भिजलेल्या बॉलवरही त्यांनी तुफान बॅटिंग केली. त्यामुळे त्यांना दिलेल्या लक्ष्याचा पाठलाग करणं अधिक सोपं झालं.' 
 
बंगळुरु संघ जिंकता जिंकता शेवटच्या टर्निंग पॉईंटवर हरला. हा पराभव चाहते आणि फाफच्या जिव्हारी लागला आहे. या पराभवानंतर फाफ संतापल्याचं पाहायला मिळालं. स्मिथने शेवटच्या टप्प्यात एकट्याने विजय बंगळुरूच्या हातून खेचून आणला. बंगळुरू संघाला कॅच सोडण्याची चूक चांगलीच भोवली परिणामी सामना गमवण्याची वेळ आली.