IPL 2022 GT Vs LSG : सख्खे भाऊ एकमेकांविरुद्ध मैदानात उतरणार

3 वेळा एकत्र खेळून मिळवलं चॅम्पियनशिप, आता एकमेकांविरुद्ध मैदानात उतरणार हे सख्खे भाऊ

Updated: Mar 28, 2022, 01:38 PM IST
IPL 2022 GT Vs LSG : सख्खे भाऊ एकमेकांविरुद्ध मैदानात उतरणार title=

मुंबई : आयपीएलच्या पंधराव्या हंगामाला दणक्यात सुरुवात झाली आहे. यंदाच्या आयपीएलमध्ये दोन सख्खे ज्यांनी एकत्र खेळून आयपीएलच्या 3 ट्रॉफी मिळवल्या. पण यंदाच्या हंगामात एकमेकां विरुद्ध खेळण्याशिवाय पर्याय नाही अशी अवस्था झाली आहे.

आयपहिले 3 सामने झाले असून अनपेक्षितपणे दिल्ली, पंजाब आणि कोलकाता संघांनी विजय मिळवला आहे. आज चौथा सामना दोन नव्या संघांमध्ये होणार आहे. लखनऊ विरुद्ध गुजरात सामना होत आहे. गुजरातचं नेतृत्व हार्दिक पांड्या करत आहे. 

एकेकाळी हार्दिक पांड्या आणि कृणाल पांड्या दोघंही मुंबई संघाकडून खेळले होते. मात्र मुंबईने दोघांनाही रिटेन केलं नाही. कृणालला गुजरात संघ बोली लावून आपल्या संघात घेईल असं वाटलं होतं मात्र ती अपेक्षाही फोल ठरली. अखेर लखनऊ संघाने त्याच्यावर बोली लावली.

कृणाल पांड्या लखनऊ संघातून तर हार्दिक पांड्या गुजरातकडून मैदानात खेळणार आहे. त्यामुळे यावेळी दोन सख्खे भाऊ मैदानात एकमेकांविरुद्ध खेळताना दिसणार आहेत. 

गुजरात संभाव्य प्लेइंग इलेव्हन- हार्दिक पंड्या (कर्णधार), शुभमन गिल, रहमानुल्लाह गुरबाज, अभिनव मनोहर, विजय शंकर, ऋद्धिमान साहा, राशिद खान, डेव्हिड मिलर, आर साई किशोर, मोहम्मद शमी आणि लॉकी फर्ग्युसन

लखनऊ संभाव्य प्लेइंग इलेव्हन- केएल राहुल (कर्णधार), क्विंटन डिकॉक, मनीष पांडे, आयुष बदोनी, दीपक हुड्डा, कृणाल पंड्या, कृष्णप्पा गौतम, मार्कस स्टोइनिस, रवि बिश्नोई, आवेश खान आणि एंड्रयू टाय