अंडर-17 वर्ल्ड कप : भारताचा मुकाबला कोलंबियाशी

अंडर-17 वर्ल्ड कपमध्ये भारताचा मुकाबला कोलंबियाशी रंगणार आहे. पहिल्याच मॅचमध्ये अमेरिकेला रोखल्यानंतर भारतीय टीम आता दुस-या मॅचमध्ये आपली कामगिरी आणखी उंचावण्यास आतूर असेल. 

Updated: Oct 9, 2017, 05:15 PM IST
अंडर-17 वर्ल्ड कप : भारताचा मुकाबला कोलंबियाशी  title=

नवी दिल्ली : अंडर-17 वर्ल्ड कपमध्ये भारताचा मुकाबला कोलंबियाशी रंगणार आहे. पहिल्याच मॅचमध्ये अमेरिकेला रोखल्यानंतर भारतीय टीम आता दुस-या मॅचमध्ये आपली कामगिरी आणखी उंचावण्यास आतूर असेल. 

अमेरिकविरुद्धच्या सलामीच्या लढतीत भारतीय फुटबॉल टीमनं आपल्या कामगिरीनं सा-यांचच लक्ष वेधून घेतलं. वर्ल्ड कपच्या पहिल्याच मॅचमध्ये भारतीय टीमच्या कामगिरीचं सर्वच स्तरातून कौतुक होतंय. अमरजित सिंगच्या नेतृत्त्वाखाली फिफा वर्ल्ड कप खेळत भारतीय फुटबॉल टीमनं इतिहासात नोंद केलीय.  आता कोलम्बियाविरुद्धच्या लढतीत भारतीय टीम आपल्या कामगिरीत आणखी सुधारणा करण्यास प्रयत्नशील असेल. 

अमेरिकेविरुद्ध पहिल्या हाफमध्ये भारताचा खेळ फारसा चांगला झाला नव्हता. त्यामुळे मागील मॅचमधील चुका सुधारत कोलम्बियाविरुद्ध नवी सुरुवात करण्यास अमरजितसिंगची टीम आतूर आहे. दरम्यान, 2017मध्ये कोलम्बियानं 13 मॅचस खेळल्यात त्यापैकी त्यांना 5 मॅचेसमध्ये विजय आणि 4 मॅचमध्ये पराभव सहन करावा लागलाय. चार मॅचेस या ड्रॉ झाल्यात. मेक्सिकोत झालेल्या लढतीत कोलम्बियानं भारताला 3-0 नं पराभूत केलं होतं. त्यामुळे सहाजिकच अॅडाव्हान्टेज कोलम्बियन टीमला असेल. मात्र, दोन्ही टीम्सना सलामीची लढत गमवावी लागल्यानं आता दुस-या मॅचमध्ये जी टीम मैदानावर सर्वोत्तम खेळ करेल तीच टीम बाजी मारेल..

सामन्याची वेळ : रात्री ८ वाजता

सामन्याचे ठिकाण : जवाहरलाल नेहरु स्टेडियम, नवी दिल्ली