क्रिकेटप्रेमींची निराशा, मुंबईत नाही तर 'या' राज्यात IPL 2022 फायनल मॅच

IPL मधील आताची सर्वात मोठी बातमी, अंतिम सामन्याबाबत मोठी अपडेट

Updated: Apr 16, 2022, 08:43 AM IST
क्रिकेटप्रेमींची निराशा, मुंबईत नाही तर 'या' राज्यात IPL 2022 फायनल मॅच title=

मुंबई : आयपीएलच्या पंधराव्या हंगामातील सामने चुरशीचे होत आहेत. पुणे आणि मुंबईतील स्टेडियमवर हे सामने खेळवले जात आहेत. या सामन्यादरम्यान दिल्ली टीममध्ये कोरोना घुसल्याने आता टेन्शन वाढलं आहे. तर दुसरीकडे क्रिकेटप्रेमींची निराशा होऊ शकते. 

आयपीएल 2022 मधील सर्वात मोठी अपडेट हाती आली आहे. 2022 चे आयपीएलचे अंतिम सामने महाराष्ट्रात होणार नाहीत अशी माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. 

29 मे रोजी या हंगामातील क्वालिफायर 2 चे सामने आणि अंतिम सामना हा अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर होणार असल्याची माहिती मिळाली आहे. तर क्वालिफायर 1 कोलकाताच्या ईडन गार्डनवर होण्याची शक्यता आहे. 

IPL 2022 | 'या' टीममधील सदस्य कोरोना पॉझिटिव्ह, आता काय होणार?

कोलकातामध्ये सामने खेळवले जाणार की नाही याबाबत अद्याप संभ्रम आहे. याबाबत BCCI ने अद्याप अधिकृत कोणतीही पुष्टी केली नाही. अंतिम निर्णयाकडे सर्वांचं लक्ष आहे. 

आयपीएलचे सामने मुंबईतील डी वाय पाटील, वानखेडे, ब्रेबॉर्न आणि पुण्यातील एमसीए स्टेडियमवर खेळवले जात आहेत. आयपीएलवर कोरोनाचं संकट आहे. दिल्ली टीममध्ये कोरोना घुसला आहे. फिजियो पॅट्रिक फरहार्ट यांचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. 

आयपीएलच्या सेमीफायनल आणि फायनल सामने कुठे होणार आणि त्यासाठी कोरोनाचा धोका लक्षात घेऊन प्रेक्षकांना पाहण्याची परवानगी मिळणार का? याबाबत BCCI कधी निर्णय देणार याकडे क्रिकेटप्रेमींचं लक्ष आहे.