AUS VS NZ : ग्लेन फिलिप्स बनला 'सुपरमॅन', T20 World Cup च्या इतिहासात असा कॅच पाहिलाच नसेल!

AUS VS NZ T20 WORLD CUP 2022 : कोणाला विश्वास बसणार नाही, असा कॅच फिलिप्सने पकडल्याने सर्वांचे डोळे उघडेच्या उघडे राहिले.

Updated: Oct 22, 2022, 05:34 PM IST
AUS VS NZ : ग्लेन फिलिप्स बनला 'सुपरमॅन', T20 World Cup च्या इतिहासात असा कॅच पाहिलाच नसेल! title=

Glenn Phillips : न्यूझीलंडने (New Zealand) टी-20 वर्ल्ड कपमध्ये (T20 World Cup 2022) गतविजेत्या ऑस्ट्रेलियावर (Australia) 89 धावांनी दणदणीत विजय मिळवला आहे. पहिल्याच सामन्यात गतविजेत्या ऑस्ट्रेलियाच्या दांड्या गुल करत न्यूझीलंडने वर्ल्ड कपवर दावेदारी ठोकली आहे. अशातच या सामन्यातील एक व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाल्याचं दिसतंय. न्यूझीलंडचा स्टार फिल्डर ग्लेन फिलिप्सने 5 फुट लांब उडी मारत मार्कस स्टॉनिसला तंबुत पाठवलं. (glenn phillips takes a superman catch to dismiss Marcus Stoinis in aus vs nz match)

टी-ट्वेंटी  (T20 World Cup 2022)  वर्ल्डकपमधील 13 वा सामना New Zealand आणि Australia यांच्यात Sydney Cricket Ground वर खेळला गेला. न्यूझीलंडच्या भेदक गोलंदाजीसमोर आणि आक्रमक फलंदाजीसमोर ऑस्ट्रेलिया संघाचा निभाव लागला नाही. सर्वप्रथम फलंदाजी करताना न्यूझीलंडच्या संघाने 200 धावसंख्या उभारली. मात्र, त्यानंतर 201 धावांचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियाचे फलंदाज ढेर झाले.

आणखी वाचा - अलटी पलटी दे घुमाके! T20 World Cup मध्ये Conway चा फॅन्टास्टिक शॉट

सामन्यातील 9 वी ओव्हर टाकण्यासाठी सँटनरकडे (Mitchell Santner) बॉल सोपावण्यात आला. सँटनरने हा बॉल डीप एक्स्ट्रा कवरच्या दिशेने टोलवला. त्यावेळी डीप कवरवर फिल्डिंग करत असलेला ग्लेन फिलिप्स (Glenn Phillips) धावत गेला आणि 5 फूट लांब उडी मारत बॉल पकडला. कोणाला विश्वास बसणार नाही, असा कॅच फिलिप्सने पकडल्याने सर्वांचे डोळे उघडेच्या उघडे राहिले.

पाहा व्हिडीओ - 

दरम्यान, कॅच पकडल्यानंतर  ग्लेन फिलिप्सने (Glenn Phillips) आपल्या खास अंदाजात सेलिब्रेशन केलं. सध्या त्याचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होताना दिसत आहे. अनेकजण सोशल मीडियावर फिलिप्सचं कौतूक करताना दिसत आहे. न्यूझीलंडसाठी धोकादायक ठरू शकणाऱ्या मार्कस स्टॉनिसला ग्लेन फिलिप्सने मैदानाबाहेर पाठवलं. त्यामुळे न्यूझीलंडला दबाव तयार करता आला.