New Zealand vs Australia : सर्वात रोमांचक अशा T20 World Cup ला धमाकेदार अंदाजात सुरूवात झाली. क्वालिफायर नंतर आता सुपर 12 चे सामने खेळले जात आहेत. टी-ट्वेंटी वर्ल्ड कपमधील 13 वा सामना New Zealand आणि Australia यांच्यात खेळला जात आहे. Sydney Cricket Ground वर हा सामना खेळवला गेला. ग्रुप 1 मधील दोन धाकड संघ एकमेकांना भिडले. त्यामुळे सुपर 12 चा पहिलाच सामना रंगदार झाल्याचं दिसून येतंय.
New Zealand vs Australia यांच्यात झालेल्या सामन्यात न्यूझीलंडने 89 धावांनी दणदणीत विजय मिळवला. न्यूझीलंडने दिलेल्या 201 धावांचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियाचा संघ 111 धावांवर गारद झाला. न्यूझीलंडच्या विजयात विकेटकिपर बॅटर डिवॉन कॉनवेचा (Devon Conway) खूप मोठा वाटा होता. कॉनवेने 58 बॉलमध्ये नॉटआऊट 92 धावांची खेळी केली. त्यात त्याने 7 चौकार आणि 2 गगनचुंबी षटकार देखील खेचले आहेत.
आणखी वाचा - डोळ्यात अश्रू, दबका आवाज अन् कॅप्टन म्हणाला "मी तुम्हाला खूप..."
Devon Conway याने धुंवाधार बॅटिंग करत 200 धावा स्कोरबोर्डवर लावल्या. त्यावेळी त्याने खेळलेले आगळेवेगळे शॉट्स चर्चेत आहेत. अशातच 6 व्या ओव्हरच्या दुसऱ्या चेंडूवर कॉनवेने (Devon Conway) अजब शॉट खेळला. ऑस्ट्रेलियाचा स्टाईक बॉलर पॅट कमिन्स (Pat Cummins) गोलंदाजी करत होता. ओव्हरच्या दुसऱ्या चेंडूवर कॉनवेने फाईन लेग आणि लॉग लेगच्या दिशेने चेंडू टोलवला. त्याआधी त्याला बॉल थर्ड मॅनच्या दिशेने मारण्याची इच्छा होती. मात्र, बॉलची दिशा पाहता त्याने अखेरच्या क्षणी निर्णय बदलला.
दरम्यान, न्यूझीलंडचा ओपनर Finn Allen याने देखील आक्रमक सुरूवात करून दिली. त्याने केवळ 16 चेंडूत 42 धावांची आक्रमक फटकेबाजी केली. त्यावेळी त्याने 5 चौकार आणि 3 षटकार देखील खेचले आहेत. मात्र, दुसरीकडे ऑस्ट्रेलियाचे स्टार फलंदाज फ्लॅप झाल्याचं दिसून आलं. टीम साऊथीच्या भेदक माऱ्यापुठे ऑस्ट्रेलियाचे दिग्गज ठेर झाल्याचं दिसून आलंय.