Video : युवराज सिंगने म्हटले 'रोजी भाभी', तर हरभजनने अनुष्काला दिले हे नाव...

  विराट आणि अनुष्काने ४ वर्षांच्या रिलेशनशीपनंतर लग्न केले. आता ही पती-पत्नी साऊथ आफ्रिकेतील केपटाऊनमध्ये आहेत. 

Prashant Jadhav प्रशांत जाधव | Updated: Dec 29, 2017, 08:26 PM IST
 Video : युवराज सिंगने म्हटले 'रोजी भाभी', तर हरभजनने अनुष्काला दिले हे नाव... title=

मुंबई :  विराट आणि अनुष्काने ४ वर्षांच्या रिलेशनशीपनंतर लग्न केले. आता ही पती-पत्नी साऊथ आफ्रिकेतील केपटाऊनमध्ये आहेत. 

या जोडीने दिल्लीसोबत मुंबईतही लग्नाचे रिसेप्शन दिले. त्यात क्रिकेटसह बॉलीवूडच्या अनेक सेलिब्रिटींनी उपस्थितीती दर्शविली होती. या पार्टीतील अनेक डान्स व्हिडिओ सोशल मीडियावर झळकत आहेत. अशात क्रिकेटर हरभजन सिंगने एक व्हिडिओ शेअर केला आहे. त्यात त्याने आपल्या आवडत्या नव्या भाभी अनुष्काला नवीन नाव दिले आहे. 

सुरूवातीला युवराज सिंग याने अनुष्काला 'रोजी भाभी' असे नाव दिले. तर हरभजन कुठे मागे राहतो त्याने अनुष्काला 'चीकी' नाव ठेवले आहे. 

 

क्रिकेटर हरभजन सिंगने एक व्हिडिओ ट्विटर अकाउंटवर शेअर केला आहे. त्यात तो विराट, अनुष्का आणि शाहरूख सोबत डान्स करताना दिसत आहे. यावेळी ट्विट करताना त्याने अनुष्काला दिलेले नावही टाइप केले आहे. ‘चीकू और चीकी की शादी ने सभी को खूब नचाया.’ विराट कोहलीला प्रेमाने चिकू म्हणतात. त्यामुळे वहिनीचे नाव त्याने चीकी ठेवले आहे.