Hardik Pandya: उपकर्णधारपद मिळताच हार्दिकने ओलांडली मर्यादा; LIVE सामन्यात इशानसाठी वापरले अपशब्द?

Hardik Pandya: टीम इंडियाने एशिया कपच्या ( Asia Cup 2023 ) फायनलचं तिकीट पटकावलंय. दरम्यान या सामन्यात एक अशी घटना घडली, ज्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होताना दिसतोय. हा व्हिडीओ हार्दिक पंड्या ( Hardik Pandya ) आणि इशान किशन यांच्यामधील आहे.

सुरभि जगदीश | Updated: Sep 13, 2023, 10:57 AM IST
Hardik Pandya: उपकर्णधारपद मिळताच हार्दिकने ओलांडली मर्यादा; LIVE सामन्यात इशानसाठी वापरले अपशब्द? title=

Hardik Pandya: मंगळवारी एशिया कपच्या ( Asia Cup 2023 ) स्पर्धेमध्ये भारत विरूद्ध श्रीलंका यांच्यामध्ये सामना रंगला होता. या सामन्यामध्ये टीम इंडियाने श्रीलंकेचा 41 रन्सने पराभव केला. या विजयासह टीम इंडियाने एशिया कपच्या ( Asia Cup 2023 ) फायनलचं तिकीट पटकावलंय. दरम्यान या सामन्यात एक अशी घटना घडली, ज्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होताना दिसतोय. हा व्हिडीओ हार्दिक पंड्या ( Hardik Pandya ) आणि इशान किशन यांच्यामधील आहे. 

या सामन्यात श्रीलंकेच्या गोलंदाजांनी भारतीय टीमची ( Team India ) टॉप लाईन बॅटींग ऑर्डर पूर्णपणे धुळीस मिळवली. फलंदाजी करताना इशान किशन भारताला शेवटपर्यंत नेऊ शकला असता. मात्र भारताच्या डावाच्या 35व्या ओव्हरमध्ये ईशानने विकेट गमावली. दरम्यान यावेळी नॉन स्ट्राईकवर उभा असलेला उपकर्णधार हार्दिक पंड्या भडकला. यावेळी हार्दिकने दिलेली प्रतिक्रिया सध्या सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसतेय.

स्वस्तात माघारी परतला इशान किशन

श्रीलंकेच्या गोलंदाजांनी भारताविरुद्ध ( Ind Vs Sl ) उत्तम गोलंदाजी केली. या सामन्यात लंकेच्या स्पिन गोलंदाजीसमोर रन्स काढण्यासाठी टीम इंडियाचे फलंदाज हतबल झालेले दिसून आले. यावेळी चौथ्या क्रमांकावर फलंदाजीला इशान किशन आला होता. इशानने सेट होण्यासाठी बराच वेळ घेतला. मात्र असं असूनही तो टीमला मजबूत स्थितीत नेऊ शकला नाही. यावेळी अवघ्या 33 रन्सवर तो विकेट गमावून माघारी परतला.

इशानच्या विकेटनंतर संतापला Hardik Pandya 

श्रीलंकेविरूद्धच्या सामन्यात ईशानला रन्स काढण्यासाठी खूप संघर्ष करावा लागत होता. यावेळी त्याला रन्स करता आले नाही. इतकंच नाही तर सततच्या डॉट बॉलमुळे किशनवर दडपण आल्याचं दिसून आलं. यावेळी इशानने असलंकाच्या ओव्हरमध्ये कव्हरवर मोठा शॉट मारण्याचा प्रयत्न केला. मात्र त्याचा अंदाज चुकला आणि तो कॅचआऊट झाला.

इशान बाद झाल्यानंतर नॉन स्ट्राइकवर असलेला उपकर्णधार हार्दिक पंड्या चांगलाच संतापलेला दिसत होता. यावेळी लाइव्ह मॅचमध्ये आरडाओरडा करून हार्दिकडे संताप व्यक्त केलेला दिसला. दरम्यान हा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून चाहते यावेळी हार्दिक पंड्यावर टीका करताना दिसतायत.