'तू मुझे भूल जाए ये होने नहीं दूंगी....', हसीन जहा पुन्हा एकदा प्रेमात

हसीन जहाची पोस्ट पुन्हा एकदा सोशल मीडियावर ट्रोल, मोहम्मद शमीसाठी पाहा काय म्हणाली

Updated: Feb 22, 2022, 07:55 AM IST
'तू मुझे भूल जाए ये होने नहीं दूंगी....', हसीन जहा पुन्हा एकदा प्रेमात  title=

मुंबई : भारतीय संघाचा गोलंदाज मोहम्मद शमी (Mohammed Shami) आणि त्याची पत्नी हसीन जहा (Hasin Jahan) यांच्यातील वाद प्रत्येकाला ठाऊक आहेत. गेल्या काही दिवसांपासून शमी यांची पत्नी सोशल मीडियावर ट्रोल होत आहे. 

हसीन जहा इंस्टाग्रामवर कायमच फोटो आणि व्हिडीओ पोस्ट करत असते. पण आता शेअर केलेल्या तिच्या पोस्टवरून असं वाटतं की, तिला पुन्हा एकदा मोहम्मद शमीची आठवण येत आहे.  

हसीनला शमीची ओढ पुन्हा 

हसीन जहाने पुन्हा एकदा सोशल मीडियावर एक फोटो पोस्ट केला आहे. या फोटोमुळे हसीन शमी या दोघांच्या नात्यांची चर्चा रंगली आहे. 

हसीन जहाने आपल्या पोस्टमध्ये लिहिलं होतं की, 'भले ही मैं तुझे भूल जाऊं, लेकिन तू मुझे भूल जाए ये मैं होने नहीं दूंगी. चल मोहब्बत से ना सही लेकिन नफरत से तू मुझे याद जरूर करेगा.' 

तिच्या या पोस्टमुळे असा अंदाज लावला जात आहे की, हसीन पुन्हा शमीच्या आठवणीत व्याकूळ झाली आहे. तिला पुन्हा एकदा शमीकडे परत जायचं आहे. 

मोहम्मद  शमी आणि हसीन जहा यांच्यातील वाद 

2018 मध्ये मोहम्मद शमीवर त्याची पत्नी हसीन जहाने हल्ला, बलात्कार, हत्येचा प्रयत्न आणि घरगुती हिंसाचार या आरोपांखाली गुन्हा दाखल करण्यात आला होता. हसीन जहाने शमी आणि त्याच्या भावावर देखील गुन्हा दाखल केला होता.

शमीविरुद्ध कलम ४९८ए (हुंडा छळ) आणि कलम ३५४ (लैंगिक छळ) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. तर त्याचा भाऊ हसिद अहमद याच्यावर कलम ३५४ (लैंगिक छळ) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता.

मोहम्मद शमीने 6 जून 2014 रोजी कोलकाता स्थित मॉडेल हसीन जहाशी लग्न केले होते. हसीन एक मॉडेल होती. त्यानंतर ती कोलकाता नाईट रायडर्सची चीअर लीडर बनली.

यादरम्यान दोघांची भेट झाली आणि दोघांही एकमेकांच्या प्रेमात पडले. त्यानंतर शमीने घरच्यांच्या इच्छेविरुद्ध जाऊन लग्न केले. 17 जुलै 2015 रोजी शमीला मुलगी झाली.