Ind vs Afg: कोहलीविना कशी असेल टीम इंडियाची प्लेईंग 11? 'या' खेळाडूला मिळणार टीममध्ये एन्ट्री

India vs Afghanistan Mohali: सामन्याच्या एक दिवसापूर्वी म्हणजेच बुधवारी वैयक्तिक कारणांमुळे कोहली पहिल्या सामन्यात खेळणार नसल्याचं सांगण्यात आलं. अशात आता विराट कोहली टीममध्ये नसताना प्लेईंग 11 कसं असणार आहे ते पाहूयात.

सुरभि जगदीश | Updated: Jan 11, 2024, 09:46 AM IST
Ind vs Afg: कोहलीविना कशी असेल टीम इंडियाची प्लेईंग 11? 'या' खेळाडूला मिळणार टीममध्ये एन्ट्री title=

India vs Afghanistan Mohali: मोहालीच्या आयएल बिंद्रा स्टेडियमवर आज भारत विरूद्ध अफगाणिस्तान यांच्यात सामना रंगणार आहे. टी-20 वर्ल्डकपपूर्वी ही शेवटची आंतरराष्ट्रीय सिरीज फार महत्त्वाची मानण्यात येतेय. याशिवाय या सिरीजमध्ये रोहित शर्मा आणि विराट कोहली यांचं कमबॅक झालंय. मात्र 3 सामन्यांच्या या सिरीजमधील पहिल्या सामन्यात विराट कोहली खेळणार नसल्याचं समोर आलंय. अशात आता विराट कोहली टीममध्ये नसताना प्लेईंग 11 कसं असणार आहे ते पाहूयात.

सामन्याच्या एक दिवसापूर्वी म्हणजेच बुधवारी वैयक्तिक कारणांमुळे कोहली पहिल्या सामन्यात खेळणार नसल्याचं सांगण्यात आलं. भारताच्या प्लेइंग इलेव्हनवर नजर टाकली तर, रोहितसोबत यशस्वी जयस्वाल ओपनिंग करताना दिसण्याची शक्यता आहे. सोबत संजू सॅमसनलाही जागा मिळू शकते.

टीम इंडियाचे मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड यांनी बुधवारी सांगितले की, कोहली पहिल्या सामन्यात खेळणार नाही. तो दुसऱ्या आणि तिसऱ्या सामन्यात भाग घेणार आहे. कोहलीच्या अनुपस्थितीत टीम इंडिया शुभमन गिलला तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीची संधी देईल. विकेटकीपर फलंदाज म्हणूव संजू सॅमसनलाही प्लेइंग इलेव्हनमध्ये स्थान मिळण्याची शक्यता आहे. 

टीम इंडिया पहिल्या टी-20 सामन्यासाठी फलंदाज तिलक वर्मा आणि अक्षर पटेल यांचाही प्लेईंग इलेव्हनमध्ये समावेश करू शकते. तर गोलंदाजीमध्ये अर्शदीप सिंगसोबत आवेश खान आणि मुकेश कुमार यांच्या नावाचाही विचार केला जाऊ शकतो.

राशिद खान सिरीजमधून बाहेर

अफगाणिस्तानचा अनुभवी आणि मॅचविनर फिरकी गोलंदाज राशिद खान (Rashid Khan) संपूर्ण सिरीजतून बाहेर पडला आहे. आयसीसी वनडे वर्ल्डकप 2023 स्पर्धेनंतर राशिद खानच्या कंबरेवर शस्त्रक्रिया झाली होती. मात्र यामधनू राशिद खान पूर्णपणे बरा झालेला नाही. भारताविरुद्धच्या टी20 मालिकेसाठी अफगाणिस्तान संघात राशिद खानला संधी देण्यात आली होती. पण त्याच्या खेळण्यावर साशंकता होती. आता संपूर्ण मालिकेतून राशिद बाहेर पडल्याचं जाहीर करण्यात आलं आहे. 

पहिल्या टी-20 साठी टीम इंडियाची संभाव्य प्लेईंग 11

रोहित शर्मा (कर्णधार), यशस्वी जयसवाल, शुभमन गिल, तिलक वर्मा, रिंकू सिंह, संजू सॅमसन (विकेटकीपर), अक्षर पटेल, अर्शदीप सिंह, अवेश खान, कुलदीप यादव/रवि बिश्नोई, मुकेश कुमार