IPL 2023 Auction : तुम्ही लावा बोली...; पोलार्डच्या जागेवर कुंबळेनी सुचवला पर्याय, MI संधी देणार का?

Anil Kumble On Sikandar Raja: मुंबई कोणत्या खेळाडूवर डाव खेळणार?, यावर सर्वांच्या नजरा टिकून आहेत. अशातच आता भारताचा माजी कर्णधार अनिल कुंबळेने (IPL 2023 Auction) रोहित शर्माला मोलाचा सल्ला दिला आहे.

Updated: Dec 20, 2022, 07:48 PM IST
IPL 2023 Auction : तुम्ही लावा बोली...; पोलार्डच्या जागेवर कुंबळेनी सुचवला पर्याय, MI संधी देणार का? title=
Sikandar Raza,Anil Kumble

IPL 2023 Auction Mumbai Indians Sikandar Raza : पुढील वर्षी खेळल्या जाणाऱ्या आयपीएलच्या 16 व्या हंगामासाठी आता मिनी लिलाव (IPL 2023 Auction) होणार आहे. डिसेंबर महिन्यात कोची येथे हा लिलाव पार पडेल. त्याआधी आयपीएलमधील (ipl 2023 retained players list) सर्व 10 संघांनी रिलीज खेळाडूंची यादी बीसीसीआयने (BCCI) जाहीर केली आहे. त्यामुळे आता मिनी लिलावाची उत्सुकता आणखी शिगेला पोहोचल्याचं पहायला मिळतंय. (Sikandar Raza in Mumbai Indians India Legend Anil Kumble Suggests Marquee Spinner Sikandar Raza IPL 2023 Auction marathi news)

मिनी लिलावापूर्वी (TATA Indian Premier League Mini Auction) मुंबई इंडियन्स संघाने Jaydev Unadkat, Kieron Pollard आणि Tymal Mills यांच्यासह 13 खेळाडूंनी रिलीज केलंय. त्यामुळे मुंबईकडे 20.55 कोटी रुपये शिल्लक आहेत. त्यामुळे आता मुंबई कोणत्या खेळाडूवर डाव खेळणार?, यावर सर्वांच्या नजरा टिकून आहेत. अशातच आता भारताचा माजी कर्णधार अनिल कुंबळेने (Anil Kumble) रोहित शर्माला मोलाचा सल्ला दिला आहे.

मुंबईच्या संघाला (Mumbai Indians) ऑफ स्पिनरची गरज आहे. त्यामुळे यंदाच्या आयपीएल ऑक्शनला मुंबईने झिम्बॉब्वेच्या सिकंदर राजावर (Sikandar Raja) बोली लावाली, असं अनिल कुंबले म्हणाला आहे. मी सिकंदर राजावर जास्त भर देईन. कारण तो ऑफ स्पिनबरोबरच मधल्या फळीत फलंदाजीचा एक चांगला पर्याय ठरू शकतो, असंही कुंबळे (Anil Kumble On Sikandar Raja) म्हणाला आहे.

आणखी वाचा - IPL 2023 Mini Auction : 10 संघांनी सोडले 85 खेळाडू, वाचा कोणत्या संघाकडे किती पैसा शिल्लक?

दरम्यान, सिंकदर राजा (Sikandar Raja) सध्या चांगल्या फॉर्ममध्ये आहे आणि तो राजाची स्पिन गोलंदाजी बॅटर्सला गोंधळात टाकू शकते. त्यामुळे त्याचा प्राधान्याने विचार केला जावा, असंही कुंबळे यावेळी म्हणाला आहे. मुंबईच्या संघाकडे तगडी बॉटिंग लाईनअप आहे. तर बुमराह (Bumrah) सारखा घातक गोलंदाज देखील आहे. त्यामुळे आता पोलार्डच्या जागी एखादा ऑलराऊंडर संघात असणं हे मुंबईच्या फायद्याचं असणार आहे.