India vs Australia Final : कशी असेल वर्ल्ड कप फायनलची खेळपट्टी? कोणाला होणार फायदा?

IND vs AUS final Pitch Report : अंतिम सामना त्याच काळ्या मातीच्या खेळपट्टीवर आयोजित केला जाईल ज्याचा वापर भारत आणि पाकिस्तान यांच्यातील लीग-स्टेज सामन्यासाठी करण्यात आला होता. 

सौरभ तळेकर | Updated: Nov 18, 2023, 08:59 PM IST
India vs Australia Final : कशी असेल वर्ल्ड कप फायनलची खेळपट्टी? कोणाला होणार फायदा? title=
IND vs AUS World Cup 2023 final pitch report

IND vs AUS final : टीम इंडिया आता वर्ल्ड कपच्या (World Cup 2023) निर्णायक टप्प्यावर पोहोचली आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्ध टीम इंडिया उद्या वर्ल्ड कपचा अंतिम सामना (IND vs AUS final) खेळेल. पहिल्या सामन्यापासून टीम इंडियाने मैदानावर वर्चस्व गाजवलय. आता फायनलमध्ये जादू दाखवून वर्ल्ड कप 12 वर्षानंतर घरी आणण्याची तयारी रोहित अँड कंपनीने केली आहे. मात्र, फायनल एवढी सोपी असणार नाही. सामन्याची खेळपट्टी (Pitch Report) आणि टॉस यावर सामन्याचा निकाल अवलंबून असणार आहे. टॉस तर सामन्याआधी उडवला जाईल. मात्र, सामन्याची खेळपट्टी नेमकी कशी असेल? त्याचा फायदा कोणाला होणार? पाहा...

कशी असेल खेळपट्टी?

अंतिम सामना त्याच काळ्या मातीच्या खेळपट्टीवर आयोजित केला जाईल ज्याचा वापर भारत आणि पाकिस्तान यांच्यातील लीग-स्टेज सामन्यासाठी करण्यात आला होता. या खेळपट्टीवर आतापर्यंत फिरकीपटूंना मदत मिळाली आहे. ज्यावेळी भारत पाकिस्तान सामना झाला होता, तेव्हा टीम इंडियाने टॉस जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. या खेळपट्टीवर टीम इंडियाचे फास्टर आणि स्पिनर्स अशा दोघांना देखील मदत झाली होती. त्यामुळे उद्याची खेळपट्टी देखील तशीच असेल, अशी शक्यता वर्तविण्यात येत आहे.

Rohit sharma म्हणतो...

भारत विरुद्ध पाकिस्तानचा सामना याच खेळपट्टीवर झाला होता. त्यावेळी विकेट खूपच कोरडी होती. आता खेळपट्टीवर थोडं गवत आहे. माझ्या समजुतीनुसार, ही एक संथ विकेट असेल. उद्या खेळपट्टी बघून त्याचे मूल्यांकन करू. तापमानातही काहीशी घट झाली आहे. दव हा फॅक्टर किती मोठा असेल हे मला माहीत नाही. नाणेफेक फार मोठी भूमिका बजावेल असे मला वाटत नाही, असं मत रोहित शर्मा याने पत्रकार परिषदेत व्यक्त केलं आहे.

दोन्ही संघाची संभाव्य प्लेइंग इलेव्हन : (IND vs AUS Playing XI)

ऑस्ट्रेलिया (प्लेइंग इलेव्हन): ट्रॅव्हिस हेड, डेव्हिड वॉर्नर, मिचेल मार्श, स्टीव्हन स्मिथ, मार्नस लॅबुशेन, ग्लेन मॅक्सवेल, जोश इंग्लिस (W), पॅट कमिन्स (C), मिचेल स्टार्क, अॅडम झाम्पा, जोश हेझलवूड.

भारत (प्लेइंग इलेव्हन): रोहित शर्मा (C), शुभमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल (w), सूर्यकुमार यादव, रवींद्र जडेजा, मोहम्मद शमी, जसप्रीत बुमराह, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज.