IND vs ENG | Ajinkya Rahane पुढील सामन्यात बाहेर? आतापर्यंतची सर्वात मोठी अपडेट

टीम मजबूत स्थितीत असतानाही Ajinkya Rahane अनेकवेळा राहणे फ्लॉप होत असल्याने भारताच्या हातातून बाजी निसटताना दिसून आली आहे

Updated: Sep 6, 2021, 02:02 PM IST
IND vs ENG | Ajinkya Rahane पुढील सामन्यात बाहेर? आतापर्यंतची सर्वात मोठी अपडेट title=

नवी दिल्ली : टीम इंडियाला इग्लंड दौऱ्यात अजिंक्य रहाणेच्या परफॉर्मन्समुळे मोठे नुकसान होत आहे. टीम मजबूत स्थितीत असतानाही अनेकवेळा राहणे फ्लॉप होत असल्याने भारताच्या हातातून बाजी निसटताना दिसून आली आहे. इग्लंड विरूद्ध  टेस्ट सिरिजमध्ये 4 सामन्यांच्या 6 सत्रांमध्ये 5,1,61,18,10,14 आणि 0 असा स्कोअर राहिला आहे.

अजिंक्या रहाणेला टीम इंडियातून बाहेर केले जाऊ शकते का? याबाबत तर्क वितर्कांना उधान आले आहे. याबाबत मोठी अपडेट समोर आली आहे. टीम इंडियाचे बॅटिंग कोच विक्रम राठोड यांनी सूचक प्रतिक्रिया दिली आहे. 'अजिंक्य रहाणेचा घसरलेला परफॉर्मन्स टीमसाठी चिंतेचा विषय नाही. त्यांनी म्हटले आहे की, रहाणे मॅनचेस्टरमध्ये होणाऱ्या पाचव्या आणि शेवटच्या सामन्यातसाठी टीममध्ये सामिल होऊ शकतील.'

राठोड यांच्या मते, 'रहाणेचा खेळ सध्या समाधानकारक नाही. परंतु टीमसाठी हा चिंतेचा विषय नाही. दीर्घ काळ जेव्हा सलग खेळ केला जातो. तेव्हा धावा होऊ शकत नाही असा आऊट ऑफ फॉर्मचा काळ येत असतो. ' 

नेमक्या अशाचवेळी एका खेळाडूला टीम सपोर्टची गरज असते. आणि आम्ही तेच करीत आहोत. पुजारासोबतही असेच झाले. आम्ही त्याला सलग संधी दिल्या त्यानंतर पुजाराला देखील पुन्हा लय गवसला. रहाणेचा देखील भारतीय बॅटिंग लाईनअपमध्ये महत्वाचा रोल आहे. त्यामुळे त्याच्या फॉर्मबाबत टीममध्ये चिंतेचा विषय नाही.