IND vs ENG: टीम इंडियाची मोठी डोकेदुखी दूर, इंग्लंडचा दिग्गज खेळाडू चौथ्या कसोटीतून बाहेर

IND vs ENG: टेन्शन खल्लास! इंग्लंडचा स्टार गोलंदाज चौथ्या टेस्टमधून बाहेर, टीम इंडियासाठी आनंदाची बातमी

Updated: Aug 31, 2021, 04:00 PM IST
IND vs ENG: टीम इंडियाची मोठी डोकेदुखी दूर, इंग्लंडचा दिग्गज खेळाडू चौथ्या कसोटीतून बाहेर title=

नवी दिल्ली: भारत विरुद्ध इंग्लंड 5 कसोटी सामन्याची सुरू आहे. पहिला सामना ड्रॉ झाला तर उर्वरित दोन सामन्यात दोन्ही संघांनी 1-1 अशी बरोबरी केली आहे. 

चौथ्या कसोटी सामन्याआधी टीम इंडियासाठी आनंदाची बातमी समोर येत आहे. या सीरिजवर सर्वांची नजर असणार आहे. याचं कारण म्हणजे आता दोन्ही संघांनी बरोबरी केल्याने हा सीरिजवर विजय मिळवण्यासाठी टीम इंडियाला ही सीरिज जिंकणं गरजेचं आहे.

टीम इंडियासाठी संपूर्ण सीरिजमध्ये डोकेदुखी ठरलेला इंग्लंडचा खेळाडू म्हणजे जेम्स अँडरसन आहे. ही डोकेदुखी दूर होण्याची शक्यता आहे. याचं कारण म्हणजे त्याला चौथ्या सामन्यासाठी आराम दिला जाऊ शकतो. 

इंग्लंड संघाचे मेन कोच ख्रिस सिल्व्हरवूड अँडरसन आणि ओली रॉबिन्सन यांच्या कामगिरीबद्दल बोलताना म्हणाले की, 'मला त्यांना विश्रांती द्यायची नाही. पण आमच्यासमोर अनेक सामने आहेत. कसोटी सामने वेगाने होत आहेत त्यामुळे सतत खेळवणं देखील कठीण होत आहे. खेळाडू आपल्या परिनं खूप चांगली कामगिरी करत आहेत. जेव्हा मी मैदानातून बाहेर येतो तेव्हा मला असं कायम वाटतं की मी यांच्यासाठी काहीतरी करू पण मी निर्णय घेऊ शकत नाही.' 

जेम्सने पहिल्या कसोटी सामन्यात 4 तर दुसऱ्यामध्ये 5 आणि तिसऱ्या कसोटी सामन्यात 4 विकेट्स घेतल्या आहेत. एकूण 13 विकेट्स घेणारा जेम्स टीम इंडियाच्या फलंदाजांसाठी मोठी डोकेदुखी आहे. त्यामुळे चौथ्या कसोटीमधून तो जर त्याला आराम देण्यात आला तर त्याचा फायदा टीम इंडियाला होणार आहे. 

टीम इंडियासाठी डोकेदुखी ठरलेला इंग्लंडचा ऑलराऊंडर खेळाडू जेम्स अँडरसन चौथ्या सामन्यात खेळणार नसल्याची शक्यता आहे. असे संकेत कोचनेच दिले आहेत. इंग्लंड टीमचा 15 खेळाडूंचा संघ जाहीर झाला आहे. यामध्ये अँडरसनचं नाव आहे मात्र प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळणार की त्याला आराम देणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. 

जो रूट (कर्णधार), मोईन अली, जेम्स अँडरसन, जोनाथन बेअरस्टो (wk), सॅम बिलिंग्स, रोरी बर्न्स, सॅम करन, हसीब हमीद, डॅन लॉरेन्स, डेव्हीड मलान, क्रेग ओव्हरटन, ओली पोप, ओली रॉबिन्सन, ख्रिस वोक्स आणि मार्क वुड.