Ind vs Eng : नुकसान भरुन काढताच पांड्याने भरमैदानात धवनसमोर जोडले हात

पांड्याने जोडले हात, क्रिकेट फॅन्स झाले हैराण

Updated: Mar 28, 2021, 09:44 PM IST
Ind vs Eng : नुकसान भरुन काढताच पांड्याने भरमैदानात धवनसमोर जोडले हात title=

पुणे : भारत आणि इंग्लंड (India vs England) यांच्यात सुरु असलेल्या तिसऱ्या वनडेमध्ये जेव्हा शिखर धवन (Shikhar Dhawan) ने बेन स्टोक्स (Ben Stokes) चा कॅच पकडला तर हार्दिक पांड्या (Hardik Pandya) इमोशनल झाला आणि त्याने हात जोडले. हार्दिक पांड्या (Hardik Pandya) ला असं हात जोडतना पाहून क्रिकेट फॅन्स देखील हैराण झाले.

इंग्लंडच्या इनिंगमध्ये पाचव्या ओव्हरच्या चौथ्या बॉलमध्ये हार्दिक पांड्याने बेन स्टोक्सचा कॅच सोडला होता. त्यानंतर 11 व्या ओव्हरमध्ये टी नटराजनच्या बॉलवर बेन स्टोक्स आऊट झाला. शिखर धवनने या वेळी मात्र कॅच पकडताना कोणतीच चूक नाही केली. शिखर धवनने बेन स्टोक्सचा कॅच पकडताच हार्दिक पांड्याने मैदानात हात जोडले. 

बेन स्टोक्स आउट झाल्यानंतर हार्दिक पांड्याचं टेंशन दूर झालं. कारण स्टोक्स हा गेम चेंजर खेळाडू आहे. पांड्याचा हा व्हिडिओ आता व्हायरल होत आहे.

हार्दिक पांड्याने बेन स्टोक्सचा कॅच सोडल्यानंतर रोहित शर्मा आणि कर्णधार विराट कोहलीली विश्वासच बसत नव्हता की, पांड्याकडून कॅच सूटला. धवनने मात्र नुकसान भरुन काढली.