इंग्लंडची डोकेदुखी वाढणार, भारतीय संघाकडून 'हा' गोलंदाज खेळणार

 इंग्लंड संघाची दांडी गुल कऱण्यासाठी हा खेळाडू सज्ज, करणार दमदार एन्ट्री 

Updated: Feb 11, 2021, 04:06 PM IST
इंग्लंडची डोकेदुखी वाढणार, भारतीय संघाकडून 'हा' गोलंदाज खेळणार title=

चेन्नई: त्याच्या नुसत्या संघात येण्यानच इंग्लंड संघाला घाम फुटेल आणि भारतीय संघातील गोलंदाजांची फळी अधिक मजबूत होईल असा खास गोलंदाज आता कसोटी आणि वन डे सामन्यात पुन्हा येत आहे. भारतीय संघातील वेगवान गोलंदाज टी. नटराजन इंग्लंड संघातील फलंदाजांच्या दांड्या गुल करण्यासाठी सज्ज आहे. 
टी नटराजन 12 मार्चपासून सुरू होणाऱ्या इंग्लंड विरुद्धच्या लिमेटेड ओव्हरमध्ये खेळणार आहे. टी नटराजनला विजय हजारे ट्रॉफीच्या तमिळनाडू क्रिकेट असोसिएशनमधून मैदानावर खेळवलं जाईल. टी नटराजनने ऑस्ट्रेलिया दौऱ्यादरम्यान कसोटी, एकदिवसीय आणि टी-20 सामन्यात दमदार कामगिरी केली होती. 

या सामन्यांमधून टी नटराजननं पदार्पण केलं होतं. ऑस्ट्रेलिया दौर्‍यावर नटराजनने आपल्या दमदार कामगिरीने सर्वांची मने जिंकली होती. टी. नटराजनने नुकत्याच झालेल्या ऑस्ट्रेलिया दौर्‍यावर एक कसोटी, एक वनडे आणि तीन टी -20 आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत. त्यामुळे पुन्हा एकदा टी नटराजनला ही संधी देण्यात आली आहे. 

टी. नटराजन इंग्लंड विरुद्ध टी -२० आणि एकदिवसीय आंतरराष्ट्रीय मालिकेसाठी तंदुरुस्त आणि ताजे रहावे अशी भारतीय संघ व्यवस्थापनाची इच्छा आहे, त्यामुळे टीम इंडियाच्या विनंतीवरून बीसीसीआयने तात्काळ तमिळनाडू क्रिकेट असोसिएशन (टीएनसीए) कडून नटराजन यांना विजय हजारे ट्रॉफीसाठी खेळण्याची संधी दिली आहे. नटराजन इंग्लंड विरुद्ध नॅशनल क्रिकेट अकादमी इथे सध्या सराव करताना दिसत आहे. येणाऱ्या मालिकांमध्ये इंग्लंडची दांडी गुल कऱण्यासाठी टी नटराजन सज्ज आहे.  

अहमदाबाद इथे होणाऱ्या टी 20 सामन्याचे शेड्युल कसं असणार?
12 मार्च- पहिली टी 20
14 मार्च- दुसरी टी 20
16 मार्च- तिसरी टी 20
18 मार्च- चौथी टी 20
20 मार्च- पाचवी टी 20