WTC 2021 Final : पहिल्या सत्रात पावसाची बॅटिंग; खेळ सुरू होण्यासाठी विलंब

WTC 2021 Final Update: क्रिकेटप्रेमींसाठी निराशा...खराब वातावरणामुळे टॉस उशिरा होण्याची शक्यता 

Updated: Jun 18, 2021, 02:53 PM IST
WTC 2021 Final : पहिल्या सत्रात पावसाची बॅटिंग; खेळ सुरू होण्यासाठी विलंब title=

मुंबई: भारत विरुद्ध न्यूझीलंड वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचा अंतिम सामन्याच्या पहिल्या सत्रात पावसाची बॅटिंग पाहायला मिळाली. पावसामुळे पहिलं सत्र सुरू होण्यासाठी विलंब झाला आहे. आता पहिलं सत्र पुढे ढकलण्यात आलं असून अजून किती वाट पाहावी लागणार असा सर्वांनाच प्रश्न आहे.

इंग्लंडच्या साउथेप्टन भागात रिमझिम पाऊस पडत आहे. या पावसाचा परिणाम सामन्यावर होणार असं दिसून येत आहे. आक्रमक किंग कोहली आणि कूल कॅप्टन केन विल्यमसन दोघांचही टेन्शन वाढलं आहे. 

इंग्लंडमध्ये 18 ते 22 जून दरम्यान कसोटी सामना खेळवण्यात येणार आहे. आज दुपारी 3 वाजल्यापासून हा सामना सुरू होणार होता मात्र या सामन्यावर पावसाचं सावट दिसत आहे. नेमकं काय होणार याकडे सर्वांचं लक्ष आहे. बीसीसीआयने देखील तिथल्या परिस्थितीचा फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे.

पावसामुळे पहिलं सत्र रखडल्याचं पाहायला मिळत आहे. सर्वांनाच पाऊस कधी जाणार याची प्रतीक्षा आहे. क्रिकेटप्रेमी पावसाचं सावट दूर व्हावं म्हणून प्रार्थना करत आहेत.  ड्युक बॉलनं भारत विरुद्ध न्यूझीलंड कसोटी सामना खेळवण्यात येणार आहे. टॉसलाही  उशिरा होण्याची शक्यता आहे.