ICC World Cup 2023 : भारत-पाक सामना पाहण्यासाठी चाहते होतायत हॉस्पिटलमध्ये ॲडमीट, काय आहे प्रकरण?

क्रिकेट चाहते भारत-पाकिस्तान ( India-Pakistan ) सामन्याची अगदी आतुरतेने वाट पाहयात. जर तुम्हालाही हा सामना स्टेडियममध्ये जाऊन पाहायचा असेल तर तुम्हालाही हॉस्पिटलमध्ये बेडचं ( Hospital Beds ) बुकींग करावं लागेल. 

सुरभि जगदीश | Updated: Jul 21, 2023, 09:35 PM IST
ICC World Cup 2023 : भारत-पाक सामना पाहण्यासाठी चाहते होतायत हॉस्पिटलमध्ये ॲडमीट, काय आहे प्रकरण? title=

WC 2023 : क्रिकेट चाहते भारत-पाकिस्तान ( India-Pakistan ) सामन्याची अगदी आतुरतेने वाट पाहयात. 5 ऑक्टोबर रोजी वनडे वर्ल्डकपला ( ICC ODI World cup ) सुरुवात होणार असून 15 ऑक्टोबर रोजी भारत-पाकिस्तान ( India-Pakistan ) सामना रंगणार आहे. या हायव्होल्टेज सामन्याला स्टेडियममध्ये जाऊन पाहण्याची एक वेगळीच मजा आहे. जर तुम्हालाही हा सामना स्टेडियममध्ये जाऊन पाहायचा असेल तर तुम्हालाही हॉस्पिटलमध्ये बेडचं ( Hospital Beds ) बुकींग करावं लागेल. तुम्हाला हे वाचून नक्कीच आश्चर्य वाटलं असेल...पण भारत पाकिस्तान सामना पाहण्यासाठी आता चाहते थेट हॉस्पिटलचा बेड बुक करत असल्याचं समोर आलंय. 

यंदाचा वर्ल्डकप 2 ऑक्टोबरपासून सुरु होणार असून 15 ऑक्टोबर रोजी अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर भारत-पाकिस्तान ( India-Pakistan ) यांच्यात सामना होणार आहे. या स्टेडियमची क्षमता 1 लाखांपेक्षा जास्त आहे. त्यामुळेच या सामन्याला चाहते मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याची शक्यता आहे. 

भारत-पाकिस्तान ( India-Pakistan ) हाय-व्होल्टेज सामना पाहण्यासाठी अहमदाबादमधील हॉटेल्सच्या रूमचा भाव हा अगदी गगनाला भिडला आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, भारत-पाकिस्तान ( India-Pakistan ) मॅचमुळे हॉटेलमध्ये जागा कमी असल्याने आणि आवाजवी किंमतीमुळे चाहते थेट हॉस्पिटलमध्ये बेड बुक करतायत.

अहमदाबाद मिररने दिलेल्या एका बातमीनुसार, अहमदाबादमध्ये हॉटेलच्या रूमचं भाडे हे चाहत्यांच्या खिशाला परवडण्यासारखं नाहीये. स्टेडियमजवळच्या हॉटेलमधील एका दिवसाचं भाडं जवळपास 50 हजार रूपये इतकं आहे. त्याच वेळी रुग्णालयात एक-दोन मुक्कामासाठी त्यांना 3 हजार ते 25 हजार इतकाच खर्च करावा लागतोय. हा खर्च पाहिला तर तो हॉटेलच्या भाड्यापेक्षा सुमारे 25 हजार रुपयांनी कमी आहे. त्यामुळे चाहत्यांनीही देसी जुगाड करत हॉस्पिटलमध्ये बेड बुक केले आहेत.

अहमदाबादमधील एका हॉस्पिटलमध्ये काम करणार्‍या डॉक्टरांनी माहिती दिली की, लोक पूर्ण बॉडी चेकअपसह ( Body check up ) एक रात्र राहण्यासाठी बेड बुक करतायत. लोक कोणत्याही प्रकारची हॉस्पिटल रूम किंवा बेड बुक करण्यासाठी तयार आहेत. चाहते यावेळी संपूर्ण बॉडी चेकअप आणि रात्रभर मुक्काम करण्याची मागणी करतायत. जेणेकरून रात्रीच्या मुक्कामासोबत त्यांच्या शरीराची तपासणीही होईल. तसंच पैसेही वाचतील.