विराटने सांगितलं पहिल्या टेस्टमधील पराभवाचं कारण!

साऊथ आफ्रिके विरूद्ध केपटाऊन टेस्टमध्ये टीम इंडियाला चौथ्या दिवशी ७२ रन्सने पराभव पत्करावा लागला. टीम इंडियाच्या गोलंदाजांनी चांगलं प्रदर्शन केलं पण फलंदाजांनी निराशाजनक खेळ केला.

Updated: Jan 9, 2018, 08:36 AM IST
विराटने सांगितलं पहिल्या टेस्टमधील पराभवाचं कारण! title=

नवी दिल्ली : साऊथ आफ्रिके विरूद्ध केपटाऊन टेस्टमध्ये टीम इंडियाला चौथ्या दिवशी ७२ रन्सने पराभव पत्करावा लागला. टीम इंडियाच्या गोलंदाजांनी चांगलं प्रदर्शन केलं पण फलंदाजांनी निराशाजनक खेळ केला.

टीम इंडियाने साऊथ आफ्रिका टीमची दुसरी इनिंग १३० रन्सवर गुंडाळली होती. पण साऊथ आफ्रिकेच्या गोलंदाजांनी २०८ रन्सचं टार्गेट कठिण केलं. 

काय झाली चूक?

सामन्यानंतर विराट कोहली म्हणाला की, ‘जर पहिल्या इनिंगमध्ये मिळालेल्या संधीचा फायदा टीमने घेतला असता तर चित्र वेगळं असतं. पहिल्या इनिंगमध्ये १२ रन्सवर साऊथ आफ्रिकेच्या ३ विकेट घेतल्यानंतर त्यांना रन्स करू देणे जास्त महागात पडले’.

गोलंदाजांचं कौतुक

तो पुढे म्हणाला की, ‘आम्ही सामन्याच्या सर्वच दिवसांच्या खेळात होतो. आम्ही ड्रेसिंग रूममध्ये विचार जरत होतो की, आम्ही साऊथ आफ्रिकेला २५०-२७० रन्सच्या जवळपास रोखू. आमच्या गोलंदाजांनी चांगलं प्रदर्शन करत त्यांना २१० रन्सवर रोखलं’.

तसं होऊ शकलं नाही...

‘आमच्या गोलंदाजांनी दुस-या इनिंगमध्ये पहिल्या इनिंगमधल्या अनुभवातून चांगली गोलंदाजी केली. २०८ रन्सचं टार्गेट पूर्ण करण्यासाठी आमच्या कोणत्याही फलंदाजांनी ७५-८० रन्सचा स्कोर करणं आवश्यक होतं. पण तसं झालं नाही’.