भारताचा पाकिस्तानवर दणदणीत विजय

महिला क्रिकेट वर्ल्डकपमध्ये भारतीय संघाने पाकिस्तानवर दणदणीत विजय मिळवलाय.

Updated: Jul 2, 2017, 09:21 PM IST
भारताचा पाकिस्तानवर दणदणीत विजय title=

डर्बी : महिला क्रिकेट वर्ल्डकपमध्ये भारतीय संघाने पाकिस्तानवर दणदणीत विजय मिळवलाय.

भारताने विजयासाठी ठेवलेले १७० धावांचे आव्हान पूर्ण करताना पाकिस्तानचा संघ अवघ्या ७४ धावांत आटोपला.  भारताच्या भेदक माऱ्यासमोर पाकिस्तानच्या फलंदाजांनी अक्षरश: लोटांगण घातले. पाकिस्तानकडून केवळ दोन जणांना दोन अंकी धावसंख्या उभारता आली.  तर पाकिस्तानच्या चार जणांना भोपळाही फोडता आला नाही.

भारताच्या एकता बिश्तने पाच विकेट घेताना पाकिस्तानची दाणादाण उडवून दिली. तिला इतर गोलंदाजांचीही चांगली साथ मिळाली. 

तत्पूर्वी, भारताने टॉस जिंकताना पहिल्यांदा बॅटिंग करण्याचा निर्णय घेतला होता. पूनम राऊतच्या ४७, सुषमा वर्माच्या ३३ धावांच्या जोरावर भारताने ९ बाद १६९ धावा केल्या होत्या. 

वर्ल्डकपमधील भारताचा हा सलग तिसरा विजय आहे. याआधी भारताने यजमान इंग्लंडला त्यानंतर वेस्ट इंडिजला हरवले होते.