IND vs SL : रोहितसेनेकडून पहिल्याच सामन्यात लंकादहन; पण श्रीलंकेच्या शेपटाने झुंजवलं

भारत विरूद्ध श्रीलंका (IND vs SL) यांच्यामध्ये आज गुवाहाटीमध्ये पहिला वनडे (first ODI) सामना खेळवण्यात आला. पहिल्याच सामन्यात श्रीलंकेवर विजय मिळवत टीम इंडियाने श्री गणेशा केला आहे.

Updated: Jan 10, 2023, 09:23 PM IST
IND vs SL : रोहितसेनेकडून पहिल्याच सामन्यात लंकादहन; पण श्रीलंकेच्या शेपटाने झुंजवलं title=

Ind win first ODI : भारत विरूद्ध श्रीलंका (IND vs SL) यांच्यामध्ये आज गुवाहाटीमध्ये पहिला वनडे (first ODI) सामना खेळवण्यात आला. पहिल्याच सामन्यात श्रीलंकेवर विजय मिळवत टीम इंडियाने श्री गणेशा केला आहे. या सामन्यामध्ये भारताने 67 रन्सने श्रीलंकेचा पराभव केला आहे. या विजयाने टीम इंडियाने 3 सामन्यांच्या सिरीजमध्ये 1-0 अशी आघाडी घेतली आहे. 

टीम इंडियाच्या गोलंदाजांची कमाल

श्रीलंकेच्या टीमने प्रथम टॉस जिंकून गोलंदाजीचा निर्णय घेतला. मात्र त्यांनी घेतलेला हा निर्णय काहीसा महागडा ठरला. टीम इंडियाने 374 रन्सचं लक्ष्य श्रीलंकेसमोर ठेवलं. या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी उतरलेल्या श्रीलंकेच्या फलंदाजांची भारताच्या गोलंदाजांनी दाणादाण उडवली. यावेळी उमरान मलिकला 3 विकेट तर मोहम्मद सिराजला 2 विकेट्स घेण्यात यश आलं आहे.

श्रीलंकेच्या कर्णधाराची एकाकी झुंज

श्रीलंकेचा कर्णधार दसूना याने एकाकी झुंज देत शतक झळकावलं. त्यानंतर पथुम निसंका याने 80 बॉल्समध्ये 72 रन्सची खेळी केली. यामध्ये 11 फोरचा समावेश होता. त्यानंतर धनंजय डिसिल्व्हा यांने 47 रन्सची खेळी केली. याशिवाय श्रीलंकेकडून कोणत्याही फलंदाजाला चांगला खेळ करता आला नाही.

रोहित शर्माची कॅप्टन इनिंग

कमबॅकच्या सामन्यात रोहित शर्माने श्रीलंकेच्या गोलंदाजांची दाणादाण उडवली. रोहितने पहिल्या वनडे सामन्यात तुफानी फलंदाजी करत अर्धशतक ठोकलं आहे. आजच्या या सामन्यात रोहितने 83 रन्सची खेळी केली. ज्यामध्ये रोहितने 6 फोर आणि 2 सिक्स मारले. वनडे करियरमधील रोहितचं हे 47 वं अर्धशतक होतं. 

टीम इंडियाकडून विराट कोहलीचं तुफान शतक

पहिल्या वनडे सामन्यात विराट कोहलीने वादळी खेळी करत शतक (Virat Kohli Century) झळकावलं. कोहलीने 80 बॉल्समध्ये 100 रन्स केले. मात्र 113 रन्सवर त्याला पव्हेलियनमध्ये परतावं लागलं. कोहलीने 73 वं शतक पूर्ण (Virat Kohli 73th Century) केलं आहे. तर विराट कोहलीने आज वनडेमधील 45 वं शतक ठोकलंय. त्यामुळे त्याने महान क्रिकेटपटू सचिन तेंडूलकरच्या महान रेकॉर्डची बरोबरी केलीये.