भारताचा वेस्ट इंडिजवर शानदार विजय, १-० ने आघाडी

 टीम इंडियानं अजिंक्य रहाणेच्या सेंच्युरीच्या जोरावर वेस्ट इंडिजविरुद्धच्या दुस-या वन-डेत विजय साकरला. रहाणेनं 103 रन्सची मॅचविनिंग इनिंग खेळली. त्याची वन-डे करिअरमधील ही तिसरी सेंच्युरी ठरली आहे. धवन आणि रहाणेनं टीम इंडियाला 114 रन्सची दमदार ओपनिंग करुन दिली. त्यानंतर 87 रन्स करत कॅप्टन कोहलीनं रहाणेला चांगली साथ दिली.

Updated: Jun 26, 2017, 12:05 PM IST
भारताचा वेस्ट इंडिजवर शानदार विजय, १-० ने आघाडी title=

पोर्ट ऑफ स्पेन : टीम इंडियानं अजिंक्य रहाणेच्या सेंच्युरीच्या जोरावर वेस्ट इंडिजविरुद्धच्या दुस-या वन-डेत विजय साकरला. रहाणेनं 103 रन्सची मॅचविनिंग इनिंग खेळली. त्याची वन-डे करिअरमधील ही तिसरी सेंच्युरी ठरली आहे. धवन आणि रहाणेनं टीम इंडियाला 114 रन्सची दमदार ओपनिंग करुन दिली. त्यानंतर 87 रन्स करत कॅप्टन कोहलीनं रहाणेला चांगली साथ दिली.

टीम इंडियानं कॅरेबियन टीमसमोर विजयासाठी 311 रन्सचं टार्गेट ठेवलं होतं. हे आव्हान पार करतान विंडीजची टीम 205 रन्सचं करु शकली. या विजयासह टीम इंडियानं पाच वन-डे मॅचेसच्या सीरिजमध्ये 1-0 नं आघाडी घेतली. दरम्यान पहिली वन-डे पावसाच्या पाण्यात वाया गेल्यानंतरही दुस-या वन-डेतही पावसानं हजेरी लावली.