बाऊंसर बॉल लागल्याने भारतीय खेळाडू झाला जखमी

भारत 'ए' संघाचा ऑलराउंडर विजय शंकरला एक बाउंसर बॉल लागल्यामुळे जखमी झाला आहे. भारत 'ए' आणि दक्षिण आफ्रिका 'ए' संघात या सामना सुरु होता.

Updated: Aug 17, 2017, 06:50 PM IST
बाऊंसर बॉल लागल्याने भारतीय खेळाडू झाला जखमी title=

नवी दिल्ली : भारत 'ए' संघाचा ऑलराउंडर विजय शंकरला एक बाउंसर बॉल लागल्यामुळे जखमी झाला आहे. भारत 'ए' आणि दक्षिण आफ्रिका 'ए' संघात या सामना सुरु होता.
 
भारतीय टीम पहिली इनिंग खेळत असतांना एक बाउंसर विजयच्या खाद्यांला लागला. ज्यामुळे तो गंभीरपणे जखमी झाला. त्यानंतर विजय लगेचच मैदानाबाहेर निघून गेला. तो जखमी झाल्याने भारतीय संघाला मोठा झटका बसला आहे.

दक्षिण आफ्रिकेच्या विरोधात सुरु असलेल्या टेस्ट सीरीजच्या पहिल्या सामन्यात मॅचमध्ये भारतीय टीम चांगलं प्रदर्शन नाही करु शकली. त्यामुळे या सामन्यात त्यांचा 235 रनने पराभव झाला. याआधी भारतीय टीमने त्रिकोणीय सीरीजमध्ये मात्र चांगली कामगिरी करत ती आपल्या नावे केली होती. फायनलमध्ये शंकरने टीमच्या विजयाच महत्त्वाची भूमिका निभावली होती.