Asian Games 2023 : चक दे इंडिया! भारताने चारली पाकिस्तानला धूळ; 10-2 ने ऐतिहासिक विजय

Asian Games ind vs pak : हॉकीमध्ये भारताने पाकिस्तानचा १०-२ असा पराभव केला. या सामन्यात कर्णधार हरमनप्रीत सिंगने 4 गोल केले. भारताने पाकिस्तानविरुद्ध 10 गोल करण्याची ही पहिलीच वेळ आहे.

Updated: Sep 30, 2023, 09:50 PM IST
Asian Games 2023 : चक दे इंडिया! भारताने चारली पाकिस्तानला धूळ; 10-2 ने ऐतिहासिक विजय title=
India defeated Pakistan in Hockey by 10-2 in Asian Games 2023 Marathi News

India defeated Pakistan in Asian Games : आशियाई खेळ हांगझोऊ चीनमधील हांगझोऊ येथे खेळले जात आहेत. आशियाई क्रीडा स्पर्धेचा (Asian Games 2023) आज सातवा दिवस आहे. भारताने सात दिवसांत एकूण 38 पदके जिंकली. ज्यात 10 सुवर्ण, 14 रौप्य आणि 14 कांस्य पदकांचा समावेश आहे. या खेळांमध्ये भारताची उत्कृष्ट कामगिरी कायम असल्याचं दिसतंय. अशातच आता चीनमधून एक गुड न्यूज आली आहे. भारत आणि पाकिस्तान यांच्यातील हॉकी संघात झालेल्या सामन्यात भारताने पाकिस्तानचा लाजीरवाणा पराभव केला आहे. 

सामना सुरू होताच दोन्ही संघांनी आक्रमक खेळी करण्यास सुरूवात केली. भारताने 8 व्या मिनिटाला मनदीप सिंगने गोल केला आणि आघाडी घेतली. 10 व्या मिनिटाला पाकिस्तानचा गोलरक्षक अकमल हुसेन याने चुकी केली अन् भारताने त्याचा फायदा घेतला. त्यानंतर  11 व्या मिनिटाला हरमनप्रीत सिंगने पेनल्टीचे गोलमध्ये रुपांतर केलं अन् भारताला 2-0 ने आघाडी घेता आली. पहिल्या क्वार्टरपर्यंत टीम इंडिया आघाडीवर होती.

दुसऱ्या क्वार्टरमध्ये भारताला आणखी एक पेनल्टी कॉर्नर मिळाला. तेव्हा हरमनप्रीत कौरने पेनल्टी कॉर्नरचे गोलमध्ये रुपांतर करत पाकिस्तानला बॅकफूटवर पाठवलं. त्यानंतर 30 व्या मिनिटाला सुमितने गोल केला अन् पाकिस्तानचं टेन्शन वाढवलं. त्यानंतर पहिल्या हाफमध्ये भारताने मजबूत आघाडी घेतली होती. तिसरा क्वार्टर दोन्ही संघासाठी महत्त्वाचा होता. मात्र, इथंही भारताने केलेल्या दोन गोलमुळे पाकिस्तानचे धाबे दणाणले. हरमनप्रीत सिंगने 33 मिनिट आणि 34 व्या मिनिटाला पेनल्टी कॉर्नरवरून गोल करत पाकिस्तानला रडकुंडीला आणलं. त्यानंतर सुफियान खान याने पाकिस्ताचा भोपळा फोडला. 38 व्या मिनिटाला सामन्यात रंगत आली.

दुसऱ्या क्वार्टरच्या सुरुवातीला हरमनप्रीत कौरने १७व्या मिनिटाला पेनल्टी कॉर्नरचे गोलमध्ये रुपांतर करून पाकिस्तानला सपशेल बॅकफूटवर फेकले. भारताचा बचावही तितकाच अप्रतिम दिसला. त्यानंतर ३०व्या मिनिटाला सुमितने भन्नाट गोल करून भारताला पहिल्या हाफमध्ये ४-० अशी मजबूत आघाडी मिळवून दिली. पाकिस्तानी खेळाडूंकडे गोल करण्याच्या संधी मिळण्याची वाट पाहण्यापलिकडे काहीच उरले नव्हते. त्यात तिसऱ्या क्वार्टरमध्ये हरमनप्रीत सिंगने ३३ व ३४ व्या मिनिटाला पेनल्टी कॉर्नरवरून दोन गोल केले अन् ही आघाडी ६-० अशी भक्कम केली. अब्दुल राणा याने पाकिस्तानसाठी दुसरा गोल करत पाकिस्तानच्या आशा कायम ठेवल्या.

आणखी वाचा - खांद्यावर तिरंगा अन् डोळ्यात पाणी! सुवर्णपदक जिंकल्यानंतर स्मृती मानधनाला का आली नीरज चोप्राची आठवण?

दरम्यान, वरुण कुमार, शमशेर सिंग,  ललित उपाध्याय यांनी एकामागून एक स्टाईक करत भारताचा विजय निश्चित केला. या विजयासोबतच भारताने सेमीफायनलमध्ये प्रवेश केलाय. भारत-पाकिस्तान सामन्यातील सर्वात मोठा विजय ठरला आहे. भारतीय संघ सध्या फॉर्ममध्ये असल्याचं दिसतंय. भारताने मागील तीन सामन्यात एकूण 42 गोल केले आहेत.