IND vs PAK: विराट करणार सेंच्युरी, पाक 45.5 ओव्हरमध्ये All Out अन्...; सामना Fix? समोर आला Scorecard

IND vs PAK: सामना सुरु होण्याच्या 24 तासांपूर्वी IND vs PAK सामन्याची स्क्रिप्ट लीक झाल्याने सामना फिक्स आहे का असा सवाल आता उपस्थित होतोय. दरम्यान ही संपूर्ण कहाणी काय आहे हे पाहूया. 

सुरभि जगदीश | Updated: Oct 14, 2023, 10:48 AM IST
IND vs PAK: विराट करणार सेंच्युरी, पाक 45.5 ओव्हरमध्ये All Out अन्...; सामना Fix? समोर आला Scorecard title=

IND vs PAK: वर्ल्डकप 2023 मध्ये आज भारत विरूद्ध पाकिस्तान यांच्यात महामुकाबला रंगणार आहे. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर हा हायव्होल्टेज सामना रंगणार आहे. अवघ्या काही तासांमध्ये हा सामना रंगणार आहे. मात्र त्याचपूर्वी एक मोठी आणि महत्त्वाची बातमी समोर आलीये. या बातमीमुळे क्रिकेट प्रेमींना मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे. सामना सुरु होण्याच्या 24 तासांपूर्वी IND vs PAK सामन्याची स्क्रिप्ट लीक झाल्याने सामना फिक्स आहे का असा सवाल आता उपस्थित होतोय. दरम्यान ही संपूर्ण कहाणी काय आहे हे पाहूया. 

24 तासांपूर्वी लीक झाली IND vs PAK सामन्याची स्क्रिप्ट?

भारत आणि पाकिस्तान (IND vs PAK) या दोन्ही टीम जेव्हा एकमेकांसमोर येतात, तेव्हा तो एका महामुकाबल्यापेक्षा कमी नसतो. ब्रॉडकास्टर्सच्या म्हणण्यानुसार, हा सामना क्रिकेटच्या जगात सर्वाधिक पाहिला जातो. आज पुन्हा एकदा पाकिस्तान आणि भारत अहमदाबादमध्ये आमनेसामने येणार आहेत. मात्र यापूर्वी सोशल मीडियावर एक फोटो व्हायरल झाला आहे. 

या व्हायरल झालेल्या फोटोमध्ये तुम्ही पाहू शकता की, यामध्ये आजच्या सामन्याची संपूर्ण कहाणी दिसून येतेय. या स्क्रिनशॉटनुसार, टीम इंडिया प्रथम फलंदाजी करणार असून 4 विकेट्स गमावून 334 रन्स होती. यामध्ये विराट कोहली 83 बॉल्समध्ये नाबाद 119 रन्सची खेळी करेल. तर पाकिस्तानची टीम 237 रन्सवर ऑलआऊट होईल. दरम्यान यावरून हा सामना फिक्स तर नाही ना असा सवाल करण्यात येतोय. 

सामन्याच्या स्कोअर बोर्डचा व्हायरल झाला फोटो

दरम्यान हा फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होताना दिसतोय. मात्र या फोटोची खातरजमा झी 24 तास करत नाही. कदाचित हा फोटो मजेसाठी बनवला असू शकतो. 

भारत-पाकिस्तान सामन्यावर सट्टेबाजांची नजर

भारत आणि पाकिस्तान यांच्यात (IND vs PAK) सामना खेळला जातो तेव्हा या सामन्यावर हमखास सट्टेबाजांची नजर असते. सट्टा बाजरीला या सामन्यात भरपूर पैसे देतात. भारतात बेटिंग बेकायदेशीर आहे आणि बेटिंग खेळताना पकडल्यास कठोर शिक्षेची तरतूद आहे. 

भारताची संभाव्य प्लेईंग इलेव्हन

 रोहित शर्मा (कर्णधार), ईशान किशन, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल (विकेटकीपर), हार्दिक पंड्या, रवींद्र जडेजा, मोहम्मद शमी/ रव‍िचंद्रन अश्व‍िन, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज

पाकिस्तानची संभाव्य प्लेइंग इलेवन

अब्दुल्ला शफीक, इमाम-उल-हक, बाबर आजम (कर्णधार), मोहम्मद रिजवान (विकेटकीपर), सऊद शकील, इफ्तिखार अहमद, शादाब खान, मोहम्मद नवाज, हसन अली, शाहीन शाह आफरीदी, हारिस रऊफ.