IND vs PAK: तब्बल 60 वर्षांनी टीम इंडिया पाकिस्तान दौऱ्यावर, केंद्र सरकारचा हिरवा कंदील

Davis Cup IND vs PAK : भारतीय संघ डेव्हिस चषकासाठी पाकिस्तान दौऱ्यावर जाणार आहे. केंद्र सरकारने पाकिस्तान दौऱ्यासाठी परवानगी दिली असून तब्बल 60 वर्षांनी भारत पाकिस्तान दौऱ्यावर जाणार आहे.

श्वेता चव्हाण | Updated: Jan 28, 2024, 10:33 AM IST
IND vs PAK: तब्बल 60 वर्षांनी टीम इंडिया पाकिस्तान दौऱ्यावर, केंद्र सरकारचा हिरवा कंदील title=

India tour of pakistan News In Marathi : मुंबईवर दहशतवादी हल्ल्यापासून भारत आणि पाकिस्तानमधील (IND vs PAK) संबंध ताणले गेले. याचा परिणाम मैदानातील खेळावरही झाला. त्यामुळे क्रिकेटचे अनेक सामने पाकिस्तान वगळता वेगवेगळ्या देशांमध्ये होत असतात. मात्र आता 60 वर्षांनी भारतीय टेनिस संघ पाकिस्तानच्या दौऱ्यावर जाणार आहे. यासाठी केंद्र सरकार परवानगी दिली असून आगामी डेव्हिस चषकाच्या सामन्यासाठी टीम इंडिया पाकिस्तानला जाणार आहे. (Davis Cup IND vs PAK) पाकिस्तान उच्चायुक्तालयाने भारतीय डेव्हिटीज कप संघातील आणि सपोर्ट्स स्टाफसाठी व्हिसाही जारी केला असून टीम इंडिया आणि पाकिस्तान यांच्या डेव्हिस चषक स्पर्धेतील गट-1 सामना 3 आणि 4 फेब्रुवारी रोजी इस्लामाबाद येथे खेळवला जाणार आहे. 

आंतरराष्ट्रीय टेनिस महासंघाने (आयटीएफ) पाकिस्तानसोबतचा होणारा डेव्हिस कपचा सामना इतरत्र हलवण्याची भारताची मागणी फेटाळली होती. त्यानंतर अखिल भारतीय टेनिस असोसिएशनने (एआयटीए) भारताच्या संघाला पाकिस्तानमध्ये खेळण्याची परवानगी द्यावी अशी विनंती सरकारकडे केली होती. हा सामना खेळण्यासाठी भारताचा संघ गेला नसता तर आयटीएफ पाकिस्तान वॉकओव्हर देऊ शकला असता. मात्र आता सरकारने परवानगी दिल्याने दोन्ही संघात सामना होईल आणि विजयी संघ स्पर्धेत पुढे  जाईल. 

तब्बल 60 वर्षांनंतर पाकिस्तान दौरा

दरम्यान, भारतीय संघ 1964 मध्ये डेव्हिस कप खेळण्यासाठी पाकिस्तानला गेला होता. त्यावेळी भारताने पाकिस्तानचा 4-00 असा पराभव केला होता. त्यानंतर, 2019 मध्ये कझाकस्तानमध्ये दोन्हा संघातील सामना ठेवण्यात आला होता. त्यावेळी, एआयटीएने राजकीय तणावाचे कारण देत आयटीएफला सामना इतरत्र हालवण्याची विनंती केली होती. मात्र एआयटीएची ही मागणी मान्यही झाली होती. मात्र आता ही मागणी अमान्य झाल्याने भारताला पाकिस्तान दौऱ्यावर जावेच लागेल आणि त्यासाठी सरकारनेही परवानगी दिली आहे.

सुमित नागल आणि शशिकुमार मुकुंद यांची माघार 

सुमित नागल आणि शशिकुमार मुकुंद यांनी पाकिस्तानमध्ये होणाऱ्या डेव्हिस कपमधून माघार घेतली आहे. त्यामुळे राजकुमार रामनाथन आणि एन. एके विरुद्ध श्रीराम बालाजी एकेरी सामने खेळतील अशी शक्यता आहे. तर दुसरीकडे युकी भांबरी दुहेरीत खेळताना दिसणार आहे. त्याच्यासोबत निकी पुनाचा किंवा साकेत मानेहे मैदानात उतरतील. डेव्हिस कपमधून निवृत्त झाल्यास रोहन बोपण्णा खेळताना दिसणार नाही.