IND vs ZIM : शिखर धवन की केएल राहुल, दोघांपैकी कर्णधार म्हणून 'बेस्ट' कोण?

टीम इंडिया विंडिजनंतर आता झिंबाब्वे दौऱ्यावर (India Tour Of Zimbabwe 2022) जातेय. टीम इंडिया-झिंबाब्वे यांच्यात 18 ऑगस्टपासून वनडे सीरिज खेळणार आहे.

Updated: Aug 12, 2022, 08:39 PM IST
IND vs ZIM : शिखर धवन की केएल राहुल, दोघांपैकी कर्णधार म्हणून 'बेस्ट' कोण? title=

हरारे : टीम इंडिया विंडिजनंतर आता झिंबाब्वे दौऱ्यावर (India Tour Of Zimbabwe 2022) जातेय. टीम इंडिया-झिंबाब्वे यांच्यात 18 ऑगस्टपासून वनडे सीरिज खेळणार आहे. या मालिकेत शिखर धवन (Shikhar Dhawan) भारतीय संघाचं नेतृत्व करणार होता. मात्र केएल राहुल (K L Rahul) दुखापतीतून सावरल्याने तडकाफडकी त्याच्याकडे कॅप्टन्सीची धुरा देण्यात आली. या तडकाफडकी घेतलेल्या निर्णयामुळे केएल की शिखर या दोघांपैकी बेस्ट कॅप्टन कोण, अशी चर्चा सुरु झालीय. या निमित्ताने या दोघांची कर्णधार म्हणून कामगिरी कशी आहे, हे आपण जाणून घेऊयात. (india tour of zimbabwe 2022 k l rahul and shikhar dhawan who is best captain see statastic)

केएलचा कॅप्टन्सीचा अनुभव

केएलला 4 सामन्यात कॅप्टन्सीचा अनुभव आहे. पण दुर्देवाने या चारही सामन्यात भारताला पराभवाचा सामना करावा लागला होता. या 4 सामन्यात 1 कसोटी आणि 3 एकदिवसीय सामन्यांचा समावेश आहे.

गब्बरला किती अनुभव?

शिखर धवनने 6 वनडे मॅचेसमध्ये टीम इंडियाचं नेतृत्व केलंय.  यापैकी 5 सामन्यात भारताला विजय मिळवून दिलाय. धवनने या व्यतिरिक्त रा 3 टी 20 सामन्यात कॅप्टन्सी केलीय. या 3 पैकी एकदा विजय आणि 2 वेळा पराभवाचा सामना करावा लागलाय. धवनला जुलै 2021 मध्ये पहिल्यांदा कॅप्टन्सी करण्याची संधी मिळाली होती. धवनने नुकत्याच झालेल्या विंडिज विरुद्धच्या वनडे सीरिजमध्येही नेतृत्व केलं होतं.

धवनच्या नेतृत्वात विंडिजचा खुर्दा 

टीम इंडियाने वनडे सीरिजमध्ये विंडिजचा 3-0 असा क्लीन स्वीप केला. तर श्रीलंकेला 2-1 ने पराभूत केलं. टीम इंडियाला 2021 मध्ये टी 20 सीरिजमध्ये श्रीलंकेकडून पराभव स्वीकारावा लागला होता.

तर दुसऱ्या बाजूला राहुलने जानेवारी महिन्यात दक्षिण आफ्रिका विरुद्ध रोहित शर्माच्या अनुपस्थितीत टीम इंडियाचं नेतृत्व केलं होतं. या आफ्रिका दौऱ्यात टीम इंडियाचा वनडे सामन्यांच्या मालिकेत  3-0 अशा एकतर्फी फरकाने पराभव  झाला होता.