धोनीचा उत्तराधिकारी त्याच्याच पुढे गेला, ऋषभ पंतची विश्वविक्रमाशी बरोबरी

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या टेस्ट मॅचमध्ये भारताचा ३१ रननी विजय झाला आहे.

Updated: Dec 12, 2018, 10:53 PM IST
धोनीचा उत्तराधिकारी त्याच्याच पुढे गेला, ऋषभ पंतची विश्वविक्रमाशी बरोबरी title=

ऍडलेड : ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या टेस्ट मॅचमध्ये भारताचा ३१ रननी विजय झाला आहे. या विजयाबरोबरच भारताचा विकेट कीपर ऋषभ पंतनं एका मॅचमध्ये सर्वाधिक कॅच पकडण्याच्या रेकॉर्डची बरोबरी केली आहे. ऋषभ पंतनं या मॅचच्या पहिल्या इनिंगमध्ये ६ आणि दुसऱ्या इनिंगमध्ये ५ असे एकूण ११ कॅच घेतले. याआधी जॅक रसेल यांनी १९९५ साली इंग्लंड विरुद्ध दक्षिण आफ्रिका मॅचमध्ये आणि एबी डिव्हिलियर्सनं २०१३ साली दक्षिण आफ्रिका विरुद्ध पाकिस्तानच्या मॅचमध्ये ११ कॅच घेतले होते.

भारताकडून सर्वाधिक कॅच घेणाच्या विक्रम याआधी ऋद्धीमान सहाच्या नावावर होता. पंतनं २०१८ साली दक्षिण आफ्रिकेविरुद्ध केपटाऊनमध्ये १० कॅच घेतले होते. बॉब टेलर आणि ऍडम गिलख्रिस्ट यांच्या नावावरही १० कॅचचं रेकॉर्ड आहे.

भारतासाठी ऑस्ट्रेलियाविरुद्ध सर्वाधिक कॅच घेण्याचं रेकॉर्ड याआधी महेंद्रसिंग धोनीच्या नावावर होतं. २०१४ साली मेलबर्नमध्ये धोनीनं ९ कॅच घेतले होते.

पंतचे दुसऱ्या इनिंगमधील कॅच

एरॉन फिंच (११ रन)

मार्कस हॅरिस (२६ रन)

शॉन मार्श (६० रन)

टीम पेन (४१ रन)

मिचेल स्टार्क (२८ रन)

पंतचे पहिल्या इनिंगमधील कॅच 

उस्मान ख्वाजा (२८ रन)

पीटर हॅण्ड्सकॉम्ब (३४ रन)

ट्रेविस हेड (७२ रन)

टीम पेन (५ रन)

मिचेल स्टार्क (१५ रन)

जॉस हेजलवूड (० रन)

ऋषभ पंतनं त्याच्या पहिल्याच टेस्ट मॅचच्या पहिल्या इनिंगमध्ये ५ कॅच पकडण्याचं रेकॉर्डही केलं होतं. आपल्या पहिल्याच टेस्टमध्ये हे रेकॉर्ड करणारा पंत पहिला भारतीय आहे. यावर्षी नॉटिंगहम टेस्टमध्ये पंतनं हे रेकॉर्ड केलं होतं.

या टेस्ट मॅचमध्ये पंतनं पहिल्या इनिंगमध्ये २५ रन आणि दुसऱ्या इनिंगमध्ये २८ रन केले. पण मोठी खेळी करण्यात तो अपयशी ठरला. विकेट कीपिंगच्या कामगिरीनं मात्र त्यानं हे अपयश धुवून काढलं आहे.

भारताचा ३१ रननी विजय

पहिल्या टेस्ट मॅचमध्ये भारताचा ३१ रननी विजय झाला आहे. यामुळे ४ टेस्ट मॅचच्या सीरिजमध्ये भारतानं १-०नं आघाडी घेतली आहे. भारतानं ठेवलेल्या ३२३ रनचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियाला २९१ रन करता आल्या. चेतेश्वर पुजाराच्या (१२३ रन) १६ व्या शतकामुळे भारताला पहिल्या इनिंगमध्ये २५० रन बनवता आले. यानंतर बॅटिंगला आलेल्या ऑस्ट्रेलियाचा २३५ रनवर ऑल आऊट झाला. भारतानं दुसऱ्या इनिंगमध्ये ३०७ रन केले आणि ऑस्ट्रेलियापुढे मोठं आव्हान ठेवलं. दुसरी टेस्ट मॅच १४ डिसेंबरपासून पर्थमध्ये सुरु होईल.