भारतीय संघातील वेगवान गोलंदाज अडकणार विवाहबंधनात

भारत विरुद्ध इंग्लंड चौथ्या कसोटी सामन्यातून 'या' कारणासाठी माघार घेतल्याची चर्चा आहे.  

Updated: Mar 3, 2021, 07:40 AM IST
भारतीय संघातील वेगवान गोलंदाज अडकणार विवाहबंधनात title=

मुंबई: नव्या वर्षात सेलिब्रिटी आणि अनेक दिग्गज लोक विवाहबंधनात अडकत आहेत. अनेक प्रसिद्ध कलाकारांनंतर आता भारतीय संघातील वेगवान गोलंदाज आपल्या आयुष्याच्या नव्या टप्प्याची सुरुवात करणार आहे. जसप्रीत बुमराहने वैयक्तीक कारणामुळे भारत विरुद्ध इंग्लंड चौथा कसोटी सामना न खेळण्याचा निर्णय घेतला होता. त्यानं तशी बीसीसीआयला विनंती देखील केली होती. याचं कारण आता समोर आलं आहे. 

जसप्रीत बुमराह आता विवाहबंधनात अडकणार आहे. जसप्रीत बुमराह लवकरच लग्न करणार आहे. ANIनं दिलेल्या वृत्तानुसार यासंदर्भात बीसीसीआयच्या अधिकाऱ्यांनी माहिती दिली. बीसीसीआय अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार 'बुमराह लवकरच लग्न करणार आहे. बुमराहने लग्नाच्या तयारीसाठी भारत विरुद्ध इंग्लंड कसोटी मालिकेच्या शेवटच्या सामन्यातून माघार घेण्याचा निर्णय घेतला होता. 

बुमराह कोणासोबत विवाहबंधनात अडकणार आहे याबाबत अद्याप कोणतीही माहिती समोर आली नाही. सूत्रांच्या माहितीनुसार बुमराह एका आठवड्यातच लग्न करणार आहे. लग्न केव्हा आणि कोठे होणार याची माहिती अजून मिळू शकली नाही.

Yuzvendra Chahal च्या पत्नीचा Dhanashree चा खास अंदाज

टी-20 सीरिजमधूनही बुमराहची माघार

भारत विरुद्ध इंग्लंड टी-20 टेस्ट सीरिज 12 मार्चपासून सुरू होत आहे. टी 20 5 सामन्यांच्या मालिकेतही बुमराह दिसणार नाही. बुमराहला या सीरिजमध्ये आराम देण्यात आला आहे. त्यानंतर भारत विरुद्ध इंग्लंड 3 वन डे सामने होणार आहेत. ही वन डे सीरिज 23 मार्चपासून सुरू होणार आहे. 

वैयक्तीक कारणामुळे जसप्रीत बुमराहने भारत विरुद्ध इंग्लंड 4 सामन्यांच्या मालिकेतील चौथा आणि शेवटचा कसोटी सामना खेळण्यातून माघार घेतली आहे. आता तो कोणासोबत विवाहबंधनात अडकणार याची उत्सुकता तर सर्वांनाच आहे. याबाबत अद्याप कोणतीही माहिती समोर आली नाही.