संपूर्ण Video : भारत वि पाकिस्तान : सामन्याचे HIGHLIGHTS

अंडर १९ वर्ल्डकपमध्ये भारत आणि पाकिस्तान यांच्यात रंगलेल्या सामन्यात भारताने बाजी मारली. भारताने पाकिस्तानवर २०३ धावांनी दणदणीत विजय मिळवत फायनलमध्ये धडक मारलीये.

archana harmalkar अर्चना हरमलकर | Updated: Jan 30, 2018, 04:07 PM IST

 

ख्राईस्टचर्च : अंडर १९ वर्ल्डकपमध्ये भारत आणि पाकिस्तान यांच्यात रंगलेल्या सामन्यात भारताने बाजी मारली. भारताने पाकिस्तानवर २०३ धावांनी दणदणीत विजय मिळवत फायनलमध्ये धडक मारलीये.

पहिल्यांदा फलंदाजी करताना भारताने ९ गड्यांच्या मोबदल्यात २७२ धावा केल्या. प्रत्युत्तरादाखल पाकिस्तानच्या फलंदाजांना केवळ ६९ धावा करता आल्या. 

भारताकडून शुभम गिलने १०२ धावांची नाबाद खेळी केली. त्याच्या नाबाद शतकी खेळीच्या जोरावर भारताला अडीचशेहून अधिक धावांचा टप्पा गाठता आला. 

त्यानंतर पाकिस्तानचा संघ फलंदाजीस आला. यावेळी भारताच्या भेदक माऱ्यासमोर पाकिस्तानचा संघ जास्त काळ तग धरु शकला नाही. पाकिस्तानचा संपूर्ण संघ ६९ धावांवर पॅव्हेलियनमध्ये परतला. 

ज्यांना हा सामना लाईव्ह पाहता आला नाही त्यांच्यासाठी सामन्यातील खास HIGHLIGHTS वर दिलेल्या व्हिडिओत पाहता येणार आहे.