Shubman Gill: शुभमन गिल याने केवळ 3 धावा करत रचला इतिहास, मोडला या दिग्गजाचा 34 वर्षे जुना विक्रम

 Shubman Gill Batting: शुभमन गिल (Shubman Gill ) याने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध (South Africa) अवघ्या 3 धावा करुन मोठा विक्रम केला. त्याने नवज्योतसिंग सिद्धू (Navjot Singh Sidhu) याचा 34 वर्ष जुना विक्रम मोडला आहे. 

Updated: Oct 7, 2022, 09:28 AM IST
Shubman Gill: शुभमन गिल याने केवळ 3 धावा करत रचला इतिहास, मोडला या दिग्गजाचा 34 वर्षे जुना विक्रम title=

India vs South Africa ODI: भारतीय संघाला दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात 9 धावांनी पराभवाला सामोरे जावे लागले. टीम इंडियाला शेवटच्या षटकात विजयासाठी 30 धावांची गरज होती. मात्र, सर्व प्रयत्न करुनही संजू सॅमसन याला केवळ 20 धावा करता आल्या. या सामन्यात भारताला पराभवाला सामोरे जावे लागले. परंतु टीम इंडियाच्या वतीने स्टार फलंदाज शुभमन गिल याने एक विक्रम आपल्या नावावर केला आहे. त्याने 34 वर्षे जुना विक्रम मोडीत काढला आहे.  

शुभमन गिल याने केली कमाल 

दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या  (South Africa) पहिल्या एकदिवसीय सामन्यात शुभमन गिल  (Shubman Gill) वाईटरित्या फ्लॉप ठरला. त्याने 7 चेंडूत फक्त 3 धावा केल्या. पण तीन धावांसह तो एकदिवसीय क्रिकेटमध्ये सर्वात कमी डावात 500 धावा करणारा नंबर 1 फलंदाज ठरला. त्याने 10 डावात 500 धावा पूर्ण केल्या आहेत. यातही विशेष बाब म्हणजे भारतासाठी एकदिवसीय सामने खेळून 500 धावा करणाऱ्या कोणत्याही फलंदाजाने इतक्या कमी डावात हा पराक्रम केलेला नाही.

या दिग्गज खेळाडूचा विक्रम मोडला 

शुभमन गिल याच्या आधी सर्वात कमी डावात 500 धावा पूर्ण करण्याचा विक्रम भारतीय दिग्गज नवज्योत सिंग सिद्धू यांच्या नावावर होता. त्यांनी 1988 मध्ये 11 डावात 500 वनडे धावा केल्या होत्या. मात्र आता गिलने हा विक्रम आपल्या नावावर केला आहे. शिखर धवन, श्रेयस अय्यर आणि केदार जाधव यांनी केवळ 13 डावात 500 धावा केल्या होत्या. 

भारतीय संघ पराभूत

भारतीय संघाकडून गोलंदाज आणि मधल्या फळीतील फलंदाजांनी अतिशय खराब खेळ केला. त्यामुळे टीम इंडियाला पराभवाला सामोरे जावे लागले. दक्षिण आफ्रिकेने प्रथम फलंदाजी करताना टीम इंडियाला 250 धावांचे लक्ष्य दिले होते. जे टीम इंडियाला गाठता आले नाही आणि 9 धावांनी सामना गमावला. भारताकडून श्रेयस अय्यरने 50 धावा केल्या. त्याचवेळी संजू सॅमसन याने 86 धावांची खेळी खेळली. हे दोन्ही फलंदाज टीम इंडियाला विजय मिळवून देऊ शकले नाहीत. तर शार्दुल ठाकूरने 33 धावा केल्या.