live : चौथ्या दिवसाच्या खेळाला सुरुवात

भारत वि दक्षिण आफ्रिका यांच्यातील पहिल्या कसोटी सामन्यातील चौथ्या दिवसाच्या खेळाला सुरुवात झालीये.

Updated: Jan 8, 2018, 02:14 PM IST
live : चौथ्या दिवसाच्या खेळाला सुरुवात title=

केपटाऊन : भारत वि दक्षिण आफ्रिका यांच्यातील पहिल्या कसोटी सामन्यातील चौथ्या दिवसाच्या खेळाला सुरुवात झालीये.

दक्षिण आफ्रिकेने दोन बाद ६५ धावसंख्येवरुन खेळण्यास सुरुवात केली. तिसऱ्या दिवसअखेर त्यांच्याकडे १४२ धावांची आघाडी होती. त्यामुळे ही आघाडी वाढवण्याचा प्रयत्न नक्कीच दक्षिण आफ्रिका करेल. 

सामन्याचा लाईव्ह स्कोर पाहण्यासाठी क्लिक करा

दुसरीकडे आफ्रिकेला कमी धावांवर रोखण्याचे आव्हान भारतीय गोलंदाजांसमोर आहे. दरम्यान, भारतीय संघ दुसऱ्या डावात चांगली कामगिरी करेल असा विश्वास चेतेश्वर पुजाराने व्यक्त केलाय.

पहिल्या सामन्यात तिसऱ्या दिवसअखेर आफ्रिकेकडे १४२ धावांची आघाडी आहे. द. आफ्रिकाने पहिल्या डावात २८६ धावा केल्या. त्यानंतर भारतीय संघाचा पहिला डाव २०९ धावांत आटोपला. द. आफ्रिकेने दुसऱ्या दिवसअखेर दोन विकेटच्या मोबदल्यात ६५ धावा केल्या.