IPL 2018: केकेआरच्या अडचणीत वाढ, आता 'हा' खेळाडू आयपीएलमधून बाहेर

आयपीएल २०१८ मध्ये शाहरुख खानची टीम कोलकाता नाईट रायडर्सच्या अडचणीत आता आणखीन वाढ झाली आहे. क्रिस लिन दुखापतीमुळे टीममधून बाहेर गेल्यानंतर आता आणखीन एक खेळाडू आयपीएलमधून बाहेर पडला आहे. पाहूयात कोण आहे हा खेळाडू...

Sunil Desale Sunil Desale | Updated: Mar 30, 2018, 10:40 PM IST
IPL 2018: केकेआरच्या अडचणीत वाढ, आता 'हा' खेळाडू आयपीएलमधून बाहेर title=
File Photo ICC

मुंबई : आयपीएल २०१८ मध्ये शाहरुख खानची टीम कोलकाता नाईट रायडर्सच्या अडचणीत आता आणखीन वाढ झाली आहे. क्रिस लिन दुखापतीमुळे टीममधून बाहेर गेल्यानंतर आता आणखीन एक खेळाडू आयपीएलमधून बाहेर पडला आहे. पाहूयात कोण आहे हा खेळाडू...

दुखापतीमुळे IPLमधून बाहेर

ऑस्ट्रेलियाचा फास्ट बॉलर मिचेल स्टार्क दुखापतीमुळे आयपीएलमधून बाहेर गेला आहे. ऑस्ट्रेलियन टीम सध्या दक्षिण आफ्रिकेच्या दौऱ्यावर आहे. या दौऱ्याच्या सुरुवातीला मिचेलला दुखापत झाली होती. आता या दुखापतीमुळे मिचेल आगामी आयपीएलमध्ये खेळू शकणार नाहीये. 

केकेआरसाठी मोठा झटका

फास्ट बॉलर मिचेल स्टार्क आयपीएलमधून बाहेर जाणं हा कोलकाता नाईट रायडर्सच्या टीमसाठी एक मोठा झटका असल्याचं मानलं जात आहे.

क्रिकेट ऑस्ट्रेलियाने केलं ट्विट

दुखापतीमुळे स्टार्क आफ्रिकेविरोधात सुरु असलेल्या टेस्ट सीरिजमधील चौथी मॅचही खेळू शकणार नाही. क्रिकेट ऑस्ट्रेलियाने ट्विट करत म्हटलं की, मिचेस स्टार्कच्या पायाला टिबियल बोन स्ट्रेस आहे. यामुळे पुढील उपचारासाठी त्याला मायदेशी जावं लागणार आहे. त्यामुळे मिचेल स्टार्क आयपीएलमध्ये खेळू शकणार नाहीये.

याआधी ऑस्ट्रेलियन खेळाडू क्रिस लिन दुखापतग्रस्त झाला. तर, ऑस्ट्रेलियन फास्ट बॉलर मिशेल जॉनसनही जखमी झाल्याचं वृत्त समोर येत आहे. स्वत: मिशेल जॉनसनने आपल्या डोक्यावर जखम झाल्याचा फोटो पोस्ट केला आहे.

जिममध्ये वर्कआऊट करताना मिशेल जॉनसन दुखापतग्रस्त झाला. आयपीएलमध्ये मुंबई आणि पंजाबच्या टीमकडून खेळणारा जॉनसन यावर्षी कोलकाताच्या टीमकडून खेळणार आहे.