IPL 2019 | चेन्नई विरुद्ध कोलकाता यांच्यात लढत , चेन्नईपुढे आंद्रे रसेलला रोखण्याचे आव्हान

रसेलने आयपीएलच्या या १२ पर्वात चमकदार कामगिरी केली आहे.  

Updated: Apr 9, 2019, 11:53 AM IST
IPL 2019 | चेन्नई विरुद्ध कोलकाता यांच्यात लढत , चेन्नईपुढे आंद्रे रसेलला रोखण्याचे आव्हान title=

चेन्नई : कोलकाता विरुद्ध चेन्नई यांच्यात मंगळवारी ८ वाजता एम ए चिंदबरम स्टेडियमवर मॅच रंगणार आहे. दोन्ही टीमसाठी ही मॅच महत्वाची असणार आहे. दोन्ही टीमने आतापर्यंत ५-५ सामने खेळले आहेत. त्यापैकी ४ मॅचमध्ये दोघांनी विजय मिळवला आहे. त्यामुळे दोन्ही टीमकडे ८ गुण आहेत. परंतु कोलकाताचा नेट रनरेट चांगला असल्याने ते अंकतालिकेत पहिल्या क्रमांकावर आहेत.

चेन्नईपुढे रसेलचे आव्हान

चेन्नई समोर विस्फोटक आंद्रे रसेलचे आव्हान असणार आहे. जर ही मॅच चेन्नईला जिंकायची असेल तर, कोणत्याही परिस्थितीत रसेलला रोखावे लागणार आहे. रसेलने आयपीएलच्या या १२ पर्वात चमकदार कामगिरी केली आहे. त्याने आतापर्यंत खेळलेल्या पहिल्या ४ मॅचमध्ये बॅटिंग करताना अनुक्रमे ४९, ४८, ६२, ४८ अशी तडाखेदार खेळी केली आहे. त्याने एकूण २२ सिक्स लगावले आहेत. त्याचे आतापर्यंत २०७ रन झाले आहेत. 

बंगळुरु विरुद्ध झालेल्या मॅचमध्ये दिनेश कार्तिक आऊट झाल्याने मैदानात आलेल्या रसेलने निर्णायक क्षणी १३ बॉलमध्ये ४८ रन्सची खेळी करत कोलकात्याला विजय मिळवून दिला. यामध्ये रसेलने ७ सिक्स ठोकले. राजस्थान विरुद्ध रविवारी (७ एप्रिल) झालेल्या मॅचमध्ये कोलकात्याचा ८ विकेटने विजय झाला. त्यामुळे त्याला खेळण्याची संधी मिळाली नाही. रसेलने बॉलिंगनेही आपली चमक दाखवून दिली आहे. रसेलने आतापर्यंत एकूण ५ विकेट घेतले आहेत.

या दोन्ही टीमने याआधी झालेली अखेरची मॅच जिंकलेली आहे. चेन्नईने शनिवारी (६ मार्च) पंजाबचा ७ विकेटने पराभव केला होता. तर कोलकाताने देखील आपल्या या आधीच्या मॅचमध्ये राजस्थानचा पराभव केला आहे. त्यामुळे दोन्ही टीममधील आत्मविश्वास नक्कीच वाढलेला असेल.

फिरकीपटूंची तिकडी

फिरकीपटूंचा विचार केला तर कोलकाता आणि चेन्नई या दोन्ही टीमकडे तोडीसतोड फिरकीपटू आहेत. चेन्नईकडे अनुभवी हरभजन सिंह, रविंद्र जडेजा आणि इमरान ताहिर सारखे फिरकीपटू आहेत. तर कोलकाताकडे कुलदीप यादव, सुनील नारायण आणि पीयूष चावला सारखे युवा फिरकीपटू आहेत. त्यामुळे दोन्ही टीमचे बॅट्समन फिरकीपटूंना कशाप्रकारे खेळतात हे पाहणे फार औत्सुक्याचे ठरणार आहेत. 

चेन्नई : महेंद्र सिंह धोनी (कॅप्टन), अंबाती रायडू, शेन वॉटसन, सुरेश रैना, फॅफ डु प्लेसिस, केदार जाधव, रविंद्र जडेजा, ड्वेन ब्रावो, दीपक चहर, शार्दुल ठाकुर, हरभजन सिंह, इमरान ताहिर, मुरली विजय, ध्रुव शौरे, ऋतुराज गायकवाड, मिचेल सैंटनर, डेविड विली, सॅम बिलिंग्स, समीर, मोनू कुमार, करन शर्मा, केएम आसिफ, मोहित शर्मा.

कोलकाता : दिनेश कार्तिक (कॅप्टन), सुनील नरेन, आंद्रे रसेल,  कार्लोस ब्रेथवेट, जो डेनली, लॉकी फर्ग्युसन, क्रिस लिन, रॉबिन उथप्पा, शुभमन गिल, हॅरी गर्नले, कुलदीप यादव, पीयूष चावला, नीतीश राणा, संदीप वॉरियर, केसी करियप्पा, श्रीकांत मुंडे, निखिल नाईक, पृथ्वी राज और प्रसिद्ध कृष्णा.