IPL 2019 VIDEO : 'कौन इतने छक्के मारता है....?' धोनीने जागवल्या 'त्या' खेळाडूच्या आठवणी

त्याच्या वादळी फलंदाजीविषयी धोनी काय म्हणतोय ऐकलं का? 

Updated: Apr 9, 2019, 09:42 PM IST
IPL 2019 VIDEO : 'कौन इतने छक्के मारता है....?' धोनीने जागवल्या 'त्या' खेळाडूच्या आठवणी  title=

मुंबई : महेंद्रसिंह धोनीच्या नेतृत्त्वाखाली यंदाच्या आयपीएलच्या हंगामात उतरलेल्या चेन्नईच्या संघाची दमदार कामगिरी पाहायला मिळत आहे. फक्त मैदानावरच नव्हे, तर मैदानाबाहेरही या संघाचीच चर्चा सुरू आहे. आशा या वातावरणात धोनी मात्र एक कर्णधार म्हणून संघाची धुरा सुरेखपणे सांभाळताना दिसत आहे. मुख्य म्हणजे विरोधी संघातील खेळाडूंनी चेन्नईच्या संघासमोर उभं केलेलं आव्हानही तो विसरलेला नाही. चेन्नईच्या संघातर्फे सोशल मीडियावर पोस्ट केलेला व्हिडिओ पाहून याचा सहज अंदाज लावता येत आहे. ज्यामध्ये धोनी आंद्रे रसेल विषयीच्या एका आठवणीला उजाळा देताना दिसत आहे. 

२०१८ मध्ये रसेलने चेन्नईच्या गोलंजादांना चांगलंच थकवलं होतं. ३६ चेंडूंमध्ये त्याने ८८ धावांची खेळी खेळली होती. ज्यामध्ये ११ षटकारांचा समावेश होता. रसेलही ही वादळी खेळी कोलकात्याच्या संघाला विजय मिळवून देऊ शकली नाही. पण, त्याची ही फटकेबाजी मात्र अनेकांना विसरता आलेली नाही हेसुद्धा तितकच खरं. 

धोनीचा व्हिडिओ पाहून तरी असंच म्हणावं लागेल. मी त्या सामन्याविषयी सगळं आठवणं अपेक्षित आहे का? ज्यामध्ये आम्हाला क्षेत्ररक्षणासाठी नऊ खेळाडू भेटले होते... असं म्हणत त्याने मैदानाबाहेर कोणी खेळाडू क्षेत्ररक्षणासाठी ठेवता येत नाही, असं विनोदी अंदाजात म्हटलं. हा (रसेल) आहे तरी कोण.... जो इतक्या षटकारांची फटकेबाजी करतो.... असाच प्रश्न तो या व्हिडिओच्या माध्यमातून विचारत आहे. धोनीच्या या प्रश्नाचं उत्तर फक्त रसेलच देऊ शकतो. पण, आता तो हे उत्तर तोंडी स्वरुपात देणार की थेट कृती करत धमाकेदार फलंदाजीच्या माध्यमातून देणार हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.