IPL : सुपर ओवरला ईशान किशनला का नाही पाठवलं? कॅप्टन रोहितने दिलं उत्तर

ईशान किशनने ९०धावा केल्या 

Updated: Sep 29, 2020, 11:43 AM IST
IPL : सुपर ओवरला ईशान किशनला का नाही पाठवलं? कॅप्टन रोहितने दिलं उत्तर  title=

मुंबई : आयपीएलच्या १३ व्या सिझनमध्ये १० व्या सामन्यात सुपर ओवर झाली. दुबईत रंगलेल्या या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगलुरू RCB ने पहिल्यांदा फलंदाजी करून तीन गडी गमावून २०१ धावा केल्या. मुंबई इंडियन्सने MI ने याला उत्तर देत पाच गडी गमावून २०१ धावा केल्या. आणि सामना सुपर ओवरमध्ये पोहोचला. 

मुंबईची सुरूवात चांगली झाली नाही आणि त्यांचे तीन गडी गमावून फक्त ३९ धावा केल्या. हार्दिक पांड्याने फक्त १५ धावा केल्या. ७८ धावाकरून चौथी विकेट देखील गमावली आहे. याचवेळी २२ वर्षांचा ईशान किशनने कीरोन पोलार्डसोबत पाचवी विकेट गमावली आहे. ११९ धावा करत संघाला विजयाच्या दारापर्यंत पोहोचवलं. 

ईशान किशनने ५८ चेंडूत २ चौके आणि ९ छक्के लगावले आणि एकूण ९९ धावा केल्या. पोलार्डने २४ धावांत ३ चौके आणि ५ छक्के मारून ६० धावा केल्या. मॅच टाय झाल्यानंतर मुंबईने सुपर ओवरमध्ये फलंदाजी करण्यासाठी किशन ऐवजी कीरोन पोलार्ड आणि हार्दिक पांड्याला संधी दिली. मात्र नवदीप सैनीने या ओवरमध्ये फक्त ७ धावा घेऊ दिल्या. तर RCB कडून एबी डिविलियर्स आणि विराट कोहलीने ८ धावा करून सामना जिंकला. 

सामन्यानंतर कॅप्टन रोहित शर्माने म्हटलं की, ईशान म्हणजे किशनच्या धावांनी आमचा सामना खेचून आणला. पोली म्हणजे पोलार्ड नेहमीप्रमाणेच शानदार राहिला. सुपर ओवरमध्ये किशन थकला होता त्याला फ्रेश वाटत नव्हतं. म्हणून त्याला सुपर ओव्हरमध्ये फलंदाजी करण्यास पाठवलं नाही.