MI vs RR | बटलरचं शतक, हेटमायरचा जोरदार मारा, मुंबईला विजयासाठी 194 धावांचं आव्हान

जॉस बटलरच्या (Jos Butller) शतकी खेळी आणि शिमरॉन हेटमायरने (Shimron Hetmyer) केलेल्या जोरदार फटकेबाजीच्या जोरावर राजस्थान रॉयल्सने मुंबई इंडियन्सला विजयासाठी 194 धावांचे आव्हान दिले आहे.

Updated: Apr 2, 2022, 05:26 PM IST
MI vs RR | बटलरचं शतक, हेटमायरचा जोरदार मारा, मुंबईला विजयासाठी 194 धावांचं आव्हान  title=

मुंबई : जॉस बटलरच्या (Jos Butller) शतकी खेळी आणि शिमरॉन हेटमायरने (Shimron Hetmyer) केलेल्या जोरदार फटकेबाजीच्या जोरावर राजस्थान रॉयल्सने मुंबई इंडियन्सला विजयासाठी 194 धावांचे आव्हान दिले आहे. राजस्थानने निर्धारित 20 ओव्हरमध्ये 8 विकेट्स गमावून 193 धावा केल्या. ( ipl 2022 mi vs rr rajsthan royals set 194 runs winning target for mumbai indians jos buttler shine)

जॉसने 68 चेंडूत 11 फोर आणि 5 सिक्सच्या मदतीने शतकी खेळी केली. शतक ठोकल्यानंतर जॉस आऊट झाला. तर शिमरॉन हेटमायरने जोरदार फटकेबाजी केली. शिमरॉनने 14 बॉलमध्ये 3 सिक्स आणि 3 फोरसह 35 धावांची वादळी खेळी केली.

तर कॅप्टन संजू सॅमसनने 30 धावांचं योगदान दिलं. तर मुंबईकडून जसप्रीत बुमराह आणि टायमल मिल्सने प्रत्येकी 3 विकेट्स घेतल्या.

मुंबई प्लेइंग इलेव्हन : रोहित शर्मा (कॅप्टन), ईशान किशन (विकेटकीपर), तिलक वर्मा, अनमोलप्रीत सिंह, किरॉन पोलार्ड, टीम डेव्हिड, डॅनियल सॅम्स, मुरुगन अश्विन, जसप्रीत बुमराह, टायमल मिल्स आणि बासिल थम्पी. 

राजस्थान रॉयल्स प्लेइंग इलेव्हन :  जोस बटलर, यशस्वी जयस्वाल, देवदत्त पडिक्कल, संजू समॅसन (कॅप्टन/विकेटकीपर), शिमरॉन हेटमायर, रियान पराग, आर अश्विन, नवदीप सैनी, प्रसिद्ध कृष्णा, ट्रेन्ट बोल्ट आणि युजवेंद्र चहल