Mumbai Indians New Jersey: नव्या हंगामात नव्या जर्सीमध्ये दिसणार मुंबई इंडियन्स, पाहा Photo

आयपीएलचा सोळावा हंगाम सुरु व्हायला आता काही दिवसांचाच अवधी उरलाय. येत्या 31 मार्चपासून आयपीएल स्पर्धेला सुरुवात होईल. या स्पर्धेत रोहित शर्माची मुंबई इंडियन्स नव्या रुपात दिसणार आहे. मुंबई इंडियन्सने नव्या जर्सीचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

Updated: Mar 10, 2023, 10:34 PM IST
Mumbai Indians New Jersey: नव्या हंगामात नव्या जर्सीमध्ये दिसणार मुंबई इंडियन्स, पाहा Photo title=

IPL 2023 : देशभरातील क्रिकेट चाहत्यांना प्रतीक्षा असलेल्या इंडियन प्रीमिअर लीग (Indian Premier League) अर्थात आयपीएल स्पर्धेला आता काही दिवसांचाचा अवधी उरलाय. येत्या 31 मार्चपासून आयपीएलच्या सोळाव्या हंगामाला सुरुवात होणार आहे. 28 मेपर्यंत आयपीएलचा थरार रंगणार आहे. आयपीएलचा पहिला सामना (IPL 2023, 1st Match) अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर 31 मार्च रोजी गुजरात टायटन्स विरूद्ध चेन्नई सुपर किंग्स (Gujarat Titans vs Chennai Super Kings) यांच्यात खेळवला जाईल. तर मुंबई इंडियन्सचा (Mumbai Indians) पहिला सामना 2 एप्रिलला होणार आहे.

मुंबई इंडियन्सची नवी जर्सी
आयपीएलच्या नव्या हंगामासाठी मुंबई इंडियन्सने नवी जर्सी लॉन्च केली आहे. त्यामुळे रोहित शर्माची मुंबई इंडियन्स आता नव्या जर्सीमध्ये दिसणार आहे. नवी जर्सी जुन्या जर्सीशी बऱ्याच प्रमाणात मिळती जुळती आहे. मुंबई इंडियन्स ट्विट करत नव्या जर्सीचे फोटो शेअर केले आहेत. यासोबत 'नव्या जर्सीमध्ये आमची मुंबई झलक' अस कॅप्शन दिलं आहे.

नव्या जर्सीबद्दल मुंबई इंडियन्सच्या प्रवक्ताने माहिती दिली आहे. नवी जर्सी ही मुंबई इंडियन्सची संस्कृती दर्शवते. आम्ही आमच्या समर्थकांच्या जोश आणि पाठिंब्याच्या बळावर मैदानात पाऊल ठेवायला सज्ज आहोत, कारण आम्ही ही जर्सी परिधान करतो, असं त्यांनी म्हटलं आहे. याशिवाय पहिल्यांदाच मुंबई इंडियन्सची जर्सी चाहत्यांनाही खरेदी करता येणार आहे. आपलं नाव आणि आवडत्या नंबरसह चाहते ही जर्सी खरेदी करु शकतात. प्रत्येक वयोगटातील फॅन्ससाठी जर्सी विविध साईज उपलब्ध असणार आहे. 

मुंबई इंडियन्सचा पहिला सामना
आयपीएल 2023 मध्ये मुंबई इंडियन्स आपला पहिला सामना 2 एप्रिलला खेळणार असून रॉयल चॅलेंजर्स बंगलोरशी दोन हात करणार आहे. तर आठ एप्रिलला चेन्नई सुपर किंग्सविरुद्ध घरच्या मैदानावर पहिला सामना खेळला जाणार आहे. गेल्या हंगामात मुंबई इंडियन्सची कामगिरी निराशाजनक झाली होती. 14 सामन्यांपैकी मुबंईला केवळ चार सामने जिंकता आले होते. पण यावेळी मुंबई इंडियन्स चांगली कामगिरी केल अशी आशा चाहते बाळगून आहेत. 

मुंबईचं वेळापत्रक:  (Mumbai Indians schedule)
मुंबई इंडियन्स साखळीत एकूण 14 सामने खेळेल. मुंबई इंडियन्स घरच्या वानखेडे मैदानावर सात सामने खेळणार आहे, तर इतर 7 सामने प्रतिस्पर्धी संघाच्या मैदानावर खेळणार आहे.  आयपीएल संघांमध्ये दोन ग्रुप करण्यात आलेत. पहिल्या ग्रुपमध्ये मुंबई इंडियन्सला स्थान देण्यात आलंय. 2013, 2015, 2017, 2019 आणि 2020 असा पाच वेळा मुंबई इंडियन्सने आयपीएल ट्रॉफीवर नाव कोरलं आहे.

मुंबई इंडियन्सचा संघ (Mumbai Indians Squad)- 
रोहित शर्मा (C), डेवॉल्ड ब्रेविस, सूर्यकुमार यादव, ईशान किशन, अर्जुन तेंडुलकर, ऋतिक शोकिन, जोफ्रा आर्चर, मोहम्मद अरशद खान, तिलक वर्मा, रमनदीप सिंह, टिम डेव्हिड, जसप्रीत बुमराह, कॅमरून ग्रीन, जाये रिचर्ड्सन, कुमार कार्तिकेय, ट्रिस्टन स्टब्स, पीयुष चावला, आकाश मधवाल, शम्स मुलानी, जेसन बेहरनडॉर्फ, नेहल वधेरा, विष्णू विनोद, राघव गोयल.