IPL 2023: आयपीएलच्या मध्यातच Rishabh Pant ची एन्ट्री, Delhi Capitals मध्ये आनंदाचं वातावरण!

IPL 2023: ऋषभ पंत (Rishabh Pant) त्याच्या भीषण कार अपघातानंतर क्रिकेट स्टेडियममध्ये प्रथमच दिसणार आहे. तो दिल्ली विरुद्ध गुजरात सामना (DC vs GT) पाहण्यासाठी उपलब्ध असणार आहे.

Updated: Apr 3, 2023, 10:36 PM IST
IPL 2023: आयपीएलच्या मध्यातच Rishabh Pant ची एन्ट्री, Delhi Capitals मध्ये आनंदाचं वातावरण! title=
IPL 2023 Rishabh Pant

DC vs GT, Rishabh Pant: टीम इंडियाचा आणि दिल्ली कॅपिटल्सचा (Delhi Capitals) स्टार विकेटकिपर फलंदाज ऋषभ पंत (Rishabh Pant) भीषण कार अपघातानंतर क्रिकेटच्या मैदानावर पहिल्यांदाच हजेरी (Appearance In Stadium) लावणार आहे. त्यासाठी आता दिल्लीचा संघ देखील सज्ज झालाय. 4 एप्रिल रोजी ऋषभ पंत दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियमवर (Arun Jaitley Stadium) गुजरात टायटन्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स सामना  (DC vs GT)  पाहण्यासाठी येणार असल्याची माहिती पीटीआयने दिली आहे. (IPL 2023 Rishabh Pant to make first appearance in stadium after accident star player to watch DC vs GT match latest sports news)

ऋषभ पंत उद्या दिल्ली कॅपिटल्स संघाला पाठिंबा देण्यासाठी अरुण जेटली स्टेडियमवर उपस्थित असेल. गेल्या वर्षी झालेल्या अपघातानंतर पंत पहिल्यांदाच स्टेडियममध्ये येणार आहे, अशी माहिती डीडीसीएचे (DDCA) संयुक्त सचिव राजन मनचंदा (Rajan Manchanda) यांनी दिली आहे.

दिल्लीतील प्रेक्षकांसाठी आनंदाची बातमी आहे. उद्या तो येतोय, असं म्हणत राजन मनचंदा यांनी दिल्लीच्या चाहत्यांची धगधगत वाढवली आहे. आम्हाला फ्रँचायझीकडून दोन तासांपूर्वी मॅसेज मिळाला आहे, असंही ते (Rajan Manchanda On Rishabh Pant) म्हणालेत.

IPL 2023: तुझा फेवरेट शॉट कोणता? Yuzi Chahal च्या प्रश्नावर Jos buttler ने दिलं हे उत्तर!

दिल्ली आणि लखनऊ (LSG vs DC) दरम्यान खेळल्या गेलेल्या सामन्यात ऋषभची सर्वांना कमतरता जाणवली. ऋषभ पंतची उपस्थिती जाणवावी यासाठी संघाने ऋषभ पंतची 17 क्रमांकाची जर्सी डगआउटमध्ये (Rishabh Pant Jursy)  लटकली होती. त्यामुळे दिल्लीचा संघ ऋषभला मिस करत असल्याचं दिसत होतं. त्यामुळे ऋषभ आता उपस्थित राहून संघाला पाठबळ देणार का? असा सवाल उपस्थित होताना दिसतोय.

दरम्यान, डिसेंबर 2022 मध्ये ऋषभ पंतचा गंभीर अपघात झाला होता. या अपघातात पंत गंभीर जखमी झाला होता. ऋषभवर अनेक शस्त्रक्रिया करण्यात आल्या होत्या. दरम्यान ऋषभ पंत पूर्णपणे रिकव्हर न झाल्याने तो क्रिकेटच्या मैदानापासून अजून बराच काळ दूर राहणार आहे.