'धोनी विलचेअरवर असेल तर CSK...'; माजी सहकाऱ्याचं MSD च्या निवृत्तीबद्दल सूचक विधान

IPL 2024 Ex-CSK Star On Dhoni Retirement: धोनीचं हे शेवटचं आयपीएल असेल अशी जोरदार चर्चा आहे. आयपीएल 2023 च्या फायनलनंतर 22 मार्चच्या सामन्यामध्ये धोनी पहिल्यांदाच मैदानात दिसणार आहे. असं असताना दुसरीकडे त्याच्या निवृत्तीचीही जोरदार चर्चा आहे.

स्वप्निल घंगाळे | Updated: Mar 15, 2024, 11:28 AM IST
'धोनी विलचेअरवर असेल तर CSK...'; माजी सहकाऱ्याचं MSD च्या निवृत्तीबद्दल सूचक विधान title=
यंदाचं पर्व हे धोनीचं शेवटचं पर्व असेल अशी चर्चा

IPL 2024 Ex-CSK Star On Dhoni Retirement: चेन्नईमधील चिन्नास्वामी स्टेडियममध्ये 22 मार्च रोजी इंडियन प्रिमिअर लीगच्या 2024 च्या पर्वातील पहिला सामना खेळवला जाणार आहे. हा सामना चेन्नई सुपर किंग्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुदरम्यान खेळवला जणार आहे. आयपीएलआधी चेन्नईचा कर्णधार महेंद्र सिंग धोनी तयारीला लागला असून तो सध्या नेट्समध्ये घाम गाळता दिसत आहे. धोनीचं हे शेवटचं आयपीएल असेल अशी जोरदार चर्चा आहे. आयपीएल 2023 च्या फायनलनंतर धोनी पहिल्यांदाच मैदानात दिसणार आहे. धोनी चेन्नईच्या संघाला सहाव्यांदा जेतेपद मिळवून देतो का याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे.

धोनीचं वैशिष्ट्य म्हणजे...

धोनीचं हे शेवटचं आयपीएल असल्याची चर्चा असल्याने अनेक आजी-माजी क्रिकेटपटूंनी धोनीबद्दलच्या आपल्या भावना जिओ सिनेमावर बोलताना व्यक्त केल्या आहेत. धोनी आणि सीएसकेच्या नात्याबद्दल बोलताना धोनीचा संघ सहकारी सुरेश रैनाने, "धोनीबद्दलची सर्वात चांगली गोष्ट म्हणजे तो आयपीएल सुरु होण्याच्या एक महिना ते 3 आठवडे आधी चेन्नईत दाखल होतो. तो दमट हवामानामध्ये रोज दोन ते 3 तास फलंदाजी करतो तसेच जीमममध्येही घाम गाळतो. यादरम्यान तो संघातील खेळाडूंशी चर्चा करत अशल्याना चांगली टीम बॉण्डींग होते. हे फारच महत्त्वाचं आणि नव्या खेळाडूंसाठी जादूई अनुभावासारखं असतं," असं मत व्यक्त केलं.

नक्की वाचा >> 'सर्वात मोठा वाद असा की...'; पंड्या-रोहितचा उल्लेख करत IPL 2024 आधी डिव्हिलियर्सचं वक्तव्य

या कारणामुळे धोनी निवृत्त होईल

सीएसकेकडून खेळलेल्या रॉबीन उथप्पानेही धोनीला निवृत्ती जाहीर करण्यासाठी कोणती गोष्ट कारणीभूत ठरु शकते याबद्दल फार रंजक विधान केलं. "सीएसकेचा संघ तो विलचेअरवर असला तरी त्याला खेळण्याची संधी देईल. तू विलचेअरवरुन ऊठ, फलंदाजी कर आणि परत जा, असं ते सांगितील. मात्र मला असं वाटतं नाही की त्याची फलंदाजी हा सध्या त्याच्या समोरील चिंतेचा विषय आहे. माझ्या मते तर फलंदाजी हा त्याच्यासाठी कधी अडचणीचा विषय ठरणारच नाही. माझ्या मते त्याच्या विकेटकिपींगवर परिणाम दिसेल. त्याच्या गुडघ्यांना त्रास जाणवत आहे. त्याला किपींग करणं आवडतं. मात्र गुडघ्यांच्या त्रासामुळे त्याला स्टम्पमागे उभं राहून संघासाठी योगदान देता येणार नाही. तो इतर कोणत्याही कारणापेक्षा याच कारणामुळे खेळापासून दूर जाईल, असं मला वाटतं," अशी प्रतिक्रिया उथप्पाने नोंदवली.

नक्की वाचा >> पंड्याकडून दिग्गजांना अपमानास्पद वागणूक? चाहते म्हणाले, 'मुंबई इंडियन्सची निवड चुकलीच'; पाहा Video

...तर त्याच्याकडे वेळ कमी आहे

इंग्लंडचा माजी कर्णधार इयॉन मॉर्गनने धोनी कधी निवृत्ती घेईल याबद्दलचा अंदाज व्यक्त केला आहे. "आपली स्वत:ची कथा स्वत: लिहिणाऱ्यांपैकी तो आहे. त्याच्यासाठी क्रिकेट खेळणं हे एखाद्या भावनेप्रमाणे आहे. मात्र रॉबीन म्हणतो त्याप्रमाणे त्याच्या गुडघ्यांची स्थिती एवढी चिंताजनक असेल तर त्याच्याकडे फार कमीच वेळ राहिला आहे. कारण त्याच्या संघाला यश मिळावं म्हणून तो कायम संघातील एक जागा आडवून ठेवू इच्छित नसावा. तो त्याच्या टायमिंगबद्दल, इतरांना मान-सन्मान देण्याबद्दल एवढ्या उत्तम आहे की त्याला असं वाटतं असावे की कोणीतरी यावं आणि तो करतोय ती जबाबादरी स्वीकारावी," असं मॉर्गन म्हणाला.